आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 388 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिका निवडणुकीत हौसे-नवसे गुडघ्याला बाशिंग बांधुन मैदानात उतरल्याने ८० जागांसाठी तब्बल ५७९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यापैकी ३८८ उमेदवारांना आपली अनामत रक्कमही वाचवता आली नाही. यात १६५ उमेदवार महत्वाच्या पक्षांचे असून २२३ उमेदवार लहान पक्ष तसेच अपक्ष उमेदवार आहेत. विशेष म्हणजे अनामत रक्कम गमावलेल्या उमेदवारांमध्ये आजी-माजी नगरसेवकांचा समावेश आहे. 
 
महापालिका निवडणुकीत एका प्रभागातून चार नगरसेवक निवडुन द्यावे लागणार होते. त्याच बरोबर १७ ते २९ हजार मतदारांची संख्या होती. प्रभागाची व्याप्ती मोठी होती. तर दुसरीकडे प्रचारासाठी उमेदवारांना केवळ १२ ते १५ दिवस मिळाले. परंतु या सर्व बाबी स्पष्ट असताना शेकडो इच्छुक निवडणुक लढवण्यास तयार होते. विविध पक्षांकडेही इच्छुकांची संख्या अधिक होती. ज्या इच्छुकांना पक्षाने उमेदवारी दिली नाही, त्या पक्षांनी दुसऱ्या पक्षाचा झेंडा घेत मैदान गाठले तर काहींनी अपक्ष म्हणुन मैदानात उडी घेतली. यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. परंतु केवळ ८० उमेदवारांनाच महापालिकेचे सभागृह गाठता आले. तर काहींना केवळ दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मात्र ३८८ उमेदवारांना अनामत रक्कमही वाचवता आली नाही. एकुण झालेल्या वैध मतदानापैकी एक षष्ठमांश मते अनामत रक्कम वाचवण्यासाठी आवश्यक असतात. एवढे मते मिळवल्यास ही किमया जिंकलेल्या तसेच पराभूत झालेल्या १९१ उमेदवारांना साधता आली. उर्वरित मात्र अनामत रक्कम वाचवु शकले नाहीत.यात राजकीय पक्षांच्या उमेदवारांचाही समावेश आहे. सर्वाधिक अनामत रक्कम राष्ट्रवादी कॉग्रेसच्या उमेदवारांनी गमावली असून कॉग्रेस आणि शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहेत.तर ४८ जागा जिंकणाऱ्या भाजपच्या १४ उमेदवारांना अनामत रक्कम गमवावी लागली. त्याच बरोबर समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, बहुजन मुक्ती पक्ष, संभाजी ब्रिगेड, रिपाइं, पिरिपा या पक्षांसह २२३ अपक्षांना अनामत रक्कम वाचवता आली नाही.५७९ उमेदवारांपैकी ८० निवडुन आलेले तसेच १११ अन्य उमेदवार अशा एकुण १९१ उमेदवारांना आपली अनामत रक्कम वाचवता आली. 
 
आजी-माजी नगरसेवकांचाही समावेश 
या३८८ उमेदवारांमध्ये आजी-माजी नगरसेवक तसेच तगड्या उमेदवारांचा समावेश आहे. यात राजकुमारी मिश्रा, मेहरुन्निसा कुरेशी, मंगला म्हैसने, फजलु पहेलवान, रिजवाना परविन शेख अजीज, सुरेश अंधारे, देवश्री ठाकरे, रामकिसन सत्याल, दिलीप देशमुख, वैशाली मानवटकर या विद्यमान नगरसेवकांचा तसेच राजु गाढे, कासम खान, पुष्पा गुलवाडे, उषा साबळे, पंकज साबळे, नंदु ढोरे या माजी नगरसेवकांचाही समावेश आहे. त्याच बरोबर जगजितसिंग विरक, अनुज तापडीया, पंकज जायले, स्वाती देशमुख, राजेश मते, बी.एस.इंगळे, तरुण बगेरे यांचाही समावेश आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...