आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाच्या १८६ कोटींच्या अंदाज पत्रकास सभेची १०० टक्के मंजुरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला -  महापालिका प्रशासनाने १८६ कोटींच्या सादर केलेल्या २०१७-२०१८ च्या अंदाज पत्रकाला २९ एप्रिल रोजी झालेल्या महासभेने कोणताही बदल सुचवता १०० टक्के मंजुरी दिली. महापालिकेच्या इतिहासात प्रशासनाने सादर केलेले अंदाज पत्रक जसेच्या तसे मंजुर करण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. 
 
महापालिका निवडणुकीमुळे २०१७-२०१८ चे अंदाज पत्रक सादर होण्यास विलंब झाला. तसेच महापौरांची निवड होऊन दोन महिन्याचा कालावधी झाला असताना अद्यापही स्थायी समिती अस्तित्वात आल्याने प्रशासनाने अंदाज पत्रक थेट महासभेसमोर सादर केले. प्रशासनाने सादर केलेल्या या अंदाज पत्रकात महापालिकेने स्वत:चे १८६ कोटी १२ लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. यातून १८६ कोटी २८ लाख रुपये खर्च अपेक्षित असून खऱ्या अर्थाने १६ लाख रुपयाच्या त्रुटीचे हे अंदाज पत्रक आहे. मात्र प्रारंभीची शिल्लक, महापालिकेचे स्वत:चे उत्पन्न तसेच शासनाकडून प्राप्त होणारा निधी ४२९ कोटी ७६ लाख रुपये उत्पन्न तर ४२१ कोटी २५ लाख रुपये खर्च जाता कोटी ५१ लाख रुपये शिलकीचे अंदाज पत्रक सादर केले. 

महापालिकेने स्वत:च्या उत्पन्नात मालमत्ता कर ६८ कोटी १५ लाख, स्थानिक संस्था कर १६ कोटी ५० लाख, विशेष पाणीपट्टी १५ कोटी, विशेष अधिनियम वसुली लाख, जमिन भाडे कोटी ७० लाख, इमारत भाडे कोटी ३० लाख, बाजारपेठ उत्पन्न ७९ लाख, उपयोगिता सेवेपासून उत्पन्न कोटी ६५ लाख, स्थानिक संस्था कर अनुदान ४७ कोटी, शिक्षण इतर अनुदाने १४ कोटी ८६ लाख, अधिमुल्य रक्कम कोटी, विकास शुल्क कोटी, संर्किण कोटी लाख असे एकुण १८६ कोटी १२ लाख रुपये उत्पन्न प्रशासनाला अपेक्षित आहे. 

या अपेक्षित उत्पन्नातून आस्थापना खर्च ४२ कोटी ६७ लाख, शिक्षण विभाग २३ कोटी लाख, निवृत्ती वेतन उपदान २२ कोटी, पाणी पुरवठा १० कोटी ७० लाख, विद्युत विभाग खर्च कोटी लाख, आरोग्य कोटी १२ लाख, मानधन खर्च कोटी ४८ लाख, जिआयएस प्रकल्प कोटी, आकस्मिक खर्च कोटी २० लाख, सभासद मानधन ८० लाख, इंधन खर्च १० लाख, अग्निशमन विभाग कोटी, नाला सफाई २० लाख, वाहन खरेदी २५ लाख, अंशदान निवृत्ती वेतन हिस्सा ६० लाख, वाहन भाडे ३५ लाख, कंत्राटी कर्मचारी खर्च कोटी १६ लाख, निवडणुक खर्च कोटी, संर्किण १० कोटी ४४ लाख, भांडवली खर्च ४४ कोटी लाख असा एकुण १८६ कोटी २८ लाख रुपये खर्च प्रशासनाला अपेक्षित आहे. प्रशासनाने सादर केलेले अंदाजित उत्पन्न तसेच खर्चाला कोणताही आक्षेप घेता सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. 

सकाळी ११ वाजता सुरु झालेल्या अंदाज पत्रकाच्या सभेत प्रत्यक्ष वाजून १५ मिनिटांनी अंदाज पत्रकावर सभागृहात चर्चा झाली. त्यापूर्वी सव्वापाच तास साफसफाईवर खर्च झाले. तर अंदाज पत्रकावरही फारशी चर्चा झाली नाही. महापालिकेचा आरसा असलेल्या या अंदाज पत्रकावर एक तास साधक-बाधक चर्चा करुन मंजुरी देण्यात आली. अंदाज पत्रकावर चर्चा करताना हरीश आलिमचंदानी यांनी महापालिकेवर कर्ज किती? कर्ज असताना शिलकीचे अंदाज पत्रक कसे? असा प्रश्न नव्याने निवडुन आलेल्या नगरसेवकांसमोर उपस्थित होणार असल्याने याबाबत सभागृहात माहिती द्यावी तसेच कापशी तलाव सौंदर्यीकरणाचे काम कसे सुरु आहे? याला आणखी निधी मिळणार आहे का? त्याच बरोबर फॉगींग मशिनसाठी २० लाखा ऐवजी ५० लाख रुपये तरतुद करावी आदी मते मांडली. तर विरोधी पक्षनेता साजिदखान यांनी इतर पदाधिकाऱ्यांना तातडीच्या निधीची अंदाज पत्रकात तरतुद केलेली असताना विरोधी पक्षनेत्याला यातून का डावलले ? हा अन्याय का? असा प्रश्न उपस्थित करुन विरोधी पक्षनेत्यालाही तातडीचा निधी उपलब्ध करण्याची मागणी केली. ही मागणी सभागृहाने मंजुर केली. तर राहुल देशमुख यांनी रेन वॉटर हॉर्वेस्टिंगचा मुद्दा उचलुन धरला. ते म्हणाले, नकाशा मंजुर करताना रेन वॉटर हॉर्वेस्टिंग सक्तीचे केले जाते. परंतु प्रत्यक्षात संबंधित घराचे बांधकाम करणारा नागरिक रेन वॉटर हॉर्वेस्टिंगची योजना राबवत नाही. भविष्यातील पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी रेन वॉटर हॉर्वेस्टिंग योजना राबवणे गरजेचे असून यासाठी नकाशा मंजुर करताना संबंधितानाकडून ठराविक रकमेचा डिमांड ड्राफ्ट घ्यावा आणि रेन वॉटर हॉर्वेस्टिंग योजना राबवल्याची तपासणी केल्या नंतर हा ड्रॉफ्ट संंबंधिताला परत करावा, असा महत्वपूर्ण प्रस्ताव सभागृहात मांडला. 

प्रत्येक नगरसेवकाला स्वेच्छा निधी 
नगरसेवकालात्याच्या प्रभागात लहान-सहान कामे करण्यासाठी होणारा त्रास लक्षात घेऊन अंदाज पत्रकात प्रत्येक नगरसेवकासाठी २० लाख रुपयाच्या स्वेच्छा निधीची तरतुद अंदाज पत्रकात करण्यात आली आहे. तर महापौरांसाठी वर्षाकाठी ५० लाख, उपमहापौर, स्थायी समिती सभापती यांना प्रत्येकी २० लाख, सभागृहनेत्याला दहा लाख, चार झोन समिती सभापतींना २० लाख तर विषय समिती सभापतींना प्रत्येकी दहा लाख रुपये निधीची तरतुद अंदाज पत्रकात करण्यात आली आहे. 

इतिहासात प्रथमच 
२००१रोजी महापालिका अस्तित्वात आली. तेव्हा पासून प्रशासनाने सादर केलेल्या अंदाज पत्रकात फार मोठा फेर बदल करुन मंजुरी देण्यात आली. प्रशासनाने प्रत्येक वेळी रिअॅलिस्टिक अंदाज पत्रक सादर करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्येक वेळी अंदाज पत्रकातील आकडे फुगवण्यात आले. मात्र यावर्षी प्रथमच प्रशासनाने सादर केलेले अंदाज पत्रक जसेच्या तसे मंजुर करण्यात आले. ही बाब महापालिकेच्या इतिहासात प्रथमच घडली. 
सभेला उपस्थित आयुक्त, महापौर उपमहापौर. 
 
प्रत्येक नगरसेवकाला स्वेच्छा निधी 
नगरसेवकालात्याच्या प्रभागात लहान-सहान कामे करण्यासाठी होणारा त्रास लक्षात घेऊन अंदाज पत्रकात प्रत्येक नगरसेवकासाठी २० लाख रुपयाच्या स्वेच्छा निधीची तरतुद अंदाज पत्रकात करण्यात आली आहे. तर महापौरांसाठी वर्षाकाठी ५० लाख, उपमहापौर, स्थायी समिती सभापती यांना प्रत्येकी २० लाख, सभागृहनेत्याला दहा लाख, चार झोन समिती सभापतींना २० लाख तर विषय समिती सभापतींना प्रत्येकी दहा लाख रुपये निधीची तरतुद अंदाज पत्रकात करण्यात आली आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...