आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप नगरसेवकांची बैठक नेमकी कुणाच्या विरोधात? आयुक्त बदली प्रकरणात गटबाजी उफाळणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- आयुक्तांची बदली तर केली होती, मात्र ही बदली मुद्दाम रोखण्यात आली, असा आरोप भाजप नगरसेवकांच्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तातडीने बोलावलेल्या बैठकीत भाजप नेत्यानींच केला. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची एैन लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तातडीची बोलावलेली महत्वाची बैठक आयुक्तांच्या विरोधात की पालकमंत्र्यांच्या विरोधात बोलावली होती? असा संभ्रम भाजप नगरसेवकांमध्ये निर्माण झाला आहे. 

तसेच या बैठकीत नेते आयुक्तांच्या विरोधात ठोस भूमिका घेतील, अशी अपेक्षा नगरसेवकांना होती. मात्र ही अपेक्षा फुसका बार ठरली. आयुक्तांविरुद्ध अविश्वास मंजुर करण्यासाठी त्यांच्या चुकांचे सबळ पुरावे संकलीत करा,असा आदेशही नेत्यांनी नगरसेवकांना दिला.  
 
गेल्या काही महिन्यांपासून महापालिका प्रशासनाची कार्यपद्धती लोकशाहीपेक्षा वेगळ्या पद्धतीने सुरु आहे. राज्य शासनाने दिलेल्या निधीतून सुरु असलेले रस्त्याची कामे, स्वच्छता योजने अंतर्गत शौचालयाची कामे वगळता, आठ महिन्यात कोणत्याही प्रभागात विकास कामे झालेली नाही. याच बरोबर पदाधिकारी, नगरसेवकांना सन्मानाची वागणुकही दिली जात नाही. त्यामुळे नगरसेवक वैतागले आहे. स्थायी समिती सभापती बाळ टाले यांच्या पत्राचे उत्तरही आयुक्तांनी अद्याप दिलेले नाही. ‘बिच्चारे’ सभापती केवळ स्मरणपत्रावर स्मरणपत्र देत आहेत. हा सर्व प्रकार नगरसेवकांनी नेत्यांच्या कानावर घातला होता. त्यामुळेच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सकाळी ११ वाजता भाजपने पक्ष कार्यालयात झालेल्या या बैठकीला खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधिर सावरकर, भाजपचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, सरचिटणीस डॉ.विनोद बोर्डे आदी उपस्थित होते. या बैठकीत आयुक्तांच्या कामकाजाबाबत नगरसेवकांनी तक्रारी  केल्या. यावर उपस्थित नेत्यांनी आयुक्तांच्या अविश्वास ठराव मंजुर करण्यासाठी ठोस माहिती काढा, आयुक्तांच्या तक्रारी सीएम पर्यंत पोचवल्या जातील, असे सांगितले.     
बातम्या आणखी आहेत...