आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढच्या महिन्यात आयुक्तांची बदली? एसपींच्याही बदलीचे संकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्हाधिकारीजी. श्रीकांत यांच्या बदलीनंतर आता मनपा आयुक्त अजय लहाने यांचीही पुढील महिन्यात बदली होत असल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांच्याही बदलीचे संकेत प्राप्त झाले आहेत. त्यामुळे नवे एसपी नवे आयुक्त कोण? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
 
तूर्तास जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे सिईओ यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे आता या नंतर कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. पुढील महिन्यात आयुक्त अजय लहाने यांची बदली निश्चित मानली जात असून, त्यांच्या बरोबरच जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांच्याही बदलीचे संकेत मिळाले आहेत. आयुक्तांची बदली यापूर्वीच होणार होती. मात्र, एका पक्षाच्या नेत्याने ही बदली थांबवली असल्याची माहिती मिळाली आहे, तर दुसरीकडे आयुक्तांच्या जागी दुसरे आयुक्त कोण? यामुळेही ही बदली थांबली होती. परंतु, आता पुढील महिन्यात आयुक्तांची बदली निश्चित मानली जात आहे. त्यामुळे महापालिकेचे १२ वे आयुक्त कोण? याबाबत चर्चा सुरू आहे.
 
आतापर्यंत झालेले आयुक्त
महापालिकेचेपहिले आयुक्त म्हणून लक्ष्मीकांत देशमुख यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर राजन भवरे, मुरलीधर घाटे, संजय काकडे, चंद्रशेखर रोकडे, दौलतखान पठाण, गिरिधर कुर्वे, डॉ. विपिन शर्मा, दीपक चौधरी, डॉ. महेंद्र कल्याणकर, सोमनाथ शेटे यांनी आयुक्त म्हणून काम केले, तर विद्यमान आयुक्त अजय लहाने आहेत.
 
सर्वाधिक कालावधी देशमुखांचा
महापालिकेत नियुक्त झालेल्या आयुक्तांपैकी कोणत्याही आयुक्ताला तीन वर्षे राहता आलेले नाही. मात्र, सर्वाधिक कालावधी हा लक्ष्मीकांत देशमुख यांचा आहे. हे दोन वर्षे आयुक्त म्हणून राहिले, तर सर्वात कमी कालावधी राजन भवरे यांचा ठरला ते केवळ चार महिने आयुक्त म्हणून राहिले, तर विद्यमान आयुक्तांना रुजू झाल्यापासून १९ महिने होत आहेत. त्यामुळे ते लक्ष्मीकांत देशमुख यांचा रेकॉर्ड तोडतात की मे महिन्यात त्यांची बदली होते. ही बाब पुढील महिन्यात स्पष्ट होईल.
बातम्या आणखी आहेत...