आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूबंदीसाठी बोरगावच्या महिलांनी घेतला पुढाकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगावमंजू - न्यायालयाच्या आदेशाने बंद झालेले मद्य विक्रीचे दुकान शहरात स्थलांतरीत करण्यास महिला ग्रामस्थांचा विरोध असतानाही संबंधीत विभागाने नव्याने मद्याची दुकाने स्थलांतरीत करण्यास परवानगी दिल्यामुळे महिला ग्रामस्थ संतप्त झाल्या आहेत. 
दरम्यान, २९ जून रोजी चार हजार पाचशे महिलांनी सह्याचे निवेदन देऊन मतदान घ्यावे, अशी मागणी महिलांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, दारू उत्पादन शुल्क अधीक्षक यांना दिले होते. त्याप्रमाणे महिलांच्या सह्यांची पडताळणी करणे क्रमप्राप्त असल्याने उद्या जुलै रोजी येथील परशुराम नाईक विद्यालयात संबंधीत महसूल उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने पडताळणी होत असल्याने दारूबंदी महिला संघर्ष समितीच्या वतीने प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली. दरम्यान, उद्या महिलांच्या स्वाक्षऱ्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात येईल. महिलांनी कायमची दारू दुकाने बंद करण्याचा निश्चय केला. दारू दुकाने बंद झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा दिला आहे.दारू बंदीसाठी प्रचार सभा, जनजागृती रॅलीत महिलांनी पुढाकार घेतला आहे. 
कायमची दारूबंदी करण्यात यावी या मागणीसाठी काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीत सहभागी झालेल्या महिला. 
बातम्या आणखी आहेत...