आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमांची पायमल्ली करत दारू विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट, जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते "स्टिंग'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जिल्ह्यातदारू विक्री करणाऱ्या दुकानदारांकडून सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहे. बऱ्याच ठिकाणी दुकानदार ग्राहकांकडून मूळ किमतीपेक्षा जास्त पैसे उकळत असल्याचा प्रकार जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी केलेल्या "स्टिंग ऑपरेशन'मुळे उघडकीस आला. पोलिसांना अधिकार नसतानाही ते काही किरकोळ कारवाया करत आहेत. या सर्व गोष्टींवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी असलेल्या उत्पादन शुल्क विभाग तुटपुंजी यंत्रणा असल्यामुळे हा प्रकार रोखण्यासाठी असमर्थ ठरत आहे. त्याचाच गैरफायदा घेत दारू दुकानदार ग्राहकांना लुटत ाहेत.
जिल्ह्यातील दारू विक्रीपासून प्रशासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. तसेच दारू विक्रेत्यांनाही मोठा फायदा होतो. यामुळेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचा परवाने वाटपात जास्त इंटरेस्ट असतो. त्यामुळेच आता शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यावर, राष्ट्रीय महामार्गावर बिअर शॉपींचा ऊत आला आहे. जिल्ह्यात बिअर शॉपी, वाइन शॉप, किरकोळ देशी दारूची दुकाने मिळून २४० दुकाने आहेत. या सर्व परवानाधारक दुकानदारांना वेळेचे, एमआरपीचे नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, यांपैकी अनेक दुकानांमध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे १६ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केलेल्या कारवाईतून दिसून आले. बंद बाटली विक्रीची परवानगी असताना काही दुकानांमध्ये परिसरात ग्राहकांकडून बिअर रिचवली जात आहे. याविरुद्ध पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिक त्रासून गेले आहेत. बिअर विक्रेत्यांनी नियम धाब्यावर बसवले आहेत. नियमानुसार कोणत्याही बिअर शॉपीमध्ये बाटलीचे झाकण उघडण्यास बंदी आहे. मात्र, याच दुकानांमध्ये १६ ते ३० वर्षे वयोगटांतील युवक त्याच ठिकाणी बिअर विकत घेऊन आजूबाजूला कोपरा पाहून बिअर पोटात रिचवत आहेत.
अवैध दारू विक्रीकडे लक्ष द्यावे
दारूविक्री कायदेशीरीत्याच केली जाते. देत असलेल्या सर्व्हिसवर जादा पैसे घेऊ शकताे. शासनाला महसूल देऊनसुद्धा अशाप्रकारे कारवाया होत असतील, तर चुकीचे आहे असे वाटते.'' राजेशएम. राऊत, अध्यक्ष,अकोला देशी-विदेशी दारू विक्रेता संघ.
नियमांचे पालन व्हावे
शासनानेपरवाना देतानाच नियमाचे बंधन घालून दिले आहे. दुकानदाराने नियमांचे पालन करणे सक्तीचे आहे. उल्लंघन झाल्याचे आढळल्यास त्या ठिकाणी आम्ही कारवाई करीत असतो.'' स्वातीकाकडे, अधीक्षक, उत्पादन शुल्कविभाग.

सातपासूनच सुरू ‘कार्यक्रम’
झाेपेतूनउठल्यानंतर चहा घेण्याच्या वेळेला काही नग दारूच्या दुकानात असतात. नियमानुसार दारूची दुकाने सकाळी दहानंतर उघडणे अपेक्षित आहे. मात्र, नियमांना धाब्यावर बसवून सकाळी सातपासूनच ‘कार्यक्रम’ सुरू होतो. नियमानुसार देशी दारू विक्रीसाठी सकाळी १० ते रात्री १०, तर बिअर विक्रीसाठी सकाळी ११.३० ते रात्री ११.३०, अशी वेळ निर्धारित आहे.

दारू पिणे वाईटच
यावृत्तातून दारूला किंवा दारूच्या व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचा मुळीच उद्देश नाही. देशी असो वा विदेशी दारू पिणे वाईटच आहे. मात्र, शासनाच्या नियमांना हरताळ फासून शासनाचा महसूल बुडवणाऱ्यांचे बिंग प्रशासनासमोर आणण्याचा हा प्रयत्न आहे.
पुढील स्लाइड्स वर वाचा, काय म्हणतो नीयम