आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कार्यक्रमात कलामांनी नाकारली होती खुर्ची, थेट विद्यार्थांमधे बसूनच मारल्या गप्पा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अकोल्यातील एका महाविद्यालयाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा आणि गोल्डन ज्युबिली कार्यक्रमासाठी डॅ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांच्यासाठी एक भली माेठी महाराजा खुर्ची आणण्यात आली हाेती. मात्र, कार्यक्रमाच्या दिवशी ती खुर्ची नाकारत ते विद्यार्थांमध्ये जाऊन बसले आणि त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारत मार्गदर्शनही केले. यावेळी डॅ. कलाम यांच्या विचारांनी विद्यार्थी चांगलेच भारावून गेले हाेते, अशी अाठवण खंडेलवाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गोपाल खंडेलवाल यांनी सांगितली.

कलाम यांच्या दु:खद निधनानंतर आठवणी सांगताना खंडेलवाल म्हणाले, की संस्थेच्या गोल्डन ज्युबिली कार्यक्रमाला कलाम यांना बोलावले. २१ मे २००९ रोजी ते महाविद्यालय इमारतीचा लोकार्पण सोहळा आणि गोल्डन ज्युबिली कार्यक्रमाला आले. जे खरे आहे त्याच मार्गावर चालण्याची प्रतिज्ञा त्यांनी विद्यार्थ्यांकडून वदवून घेतली होती. दीड तास त्यांनी संस्थेमध्ये घालवला होता. याच दिवशी त्यांनी एका विद्यार्थ्याला सर्किट हाऊस येथे भेटण्याची वेळ दिली होती. मात्र, त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कार्यक्रम उरकता घेत विद्यार्थ्याला भेटायचे आहे, म्हणून घाईघाईत सर्किट हाऊस गाठले. काही आठवणी महाविद्यालयाचे प्राचार्य जगदीश साबू यांनीसुद्धा सांगितल्या.

दोन्ही भेटीत शिक्षणावरच बोलले
मिकलाम यांना दोन वेळा भेटलो. दोन्ही भेटीत त्यांनी शिक्षणावर काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. गरिबांच्या शिक्षणावर त्यांचा भर दिसून अाला. ऑक्टोबर २०१५ मध्ये कॅरमचा इंटरनॅशनल इव्हेंट आहे. त्यासाठी आम्ही त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावणार होतो. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्काच बसला.'' प्रभजितसिंगबछेर, मानद सचिव, रेडक्रॉस