आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ पालिकांमध्ये भाजप- सेनेचे उपाध्यक्ष, काँग्रेसच्या हाती फक्त मलकापूर नगर पालिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाण्याचे उपाध्यक्ष विजय जायभाये स्वीकृत सदस्य संजय गायकवाड, नगरसेवक सैनिकांसह. - Divya Marathi
बुलडाण्याचे उपाध्यक्ष विजय जायभाये स्वीकृत सदस्य संजय गायकवाड, नगरसेवक सैनिकांसह.
बुलडाणा - जिल्हयातील नऊ नगर पालिकांच्या उपाध्यक्ष स्वीकृत सदस्यांची निवड आज बुधवार, जानेवारी रोजी सकाळी करण्यात आली. नऊपैकी चार पालिकांमध्ये भाजपचे, चार पालिकांवर शिवसेनेचे उपाध्यक्ष झाले. तर एका ठिकाणचे उपाध्यक्षपद काँग्रेसकडे गेले आहे. तसेच बुलडाणा नगर पालिकेत भाजपला स्वीकृत नगरसेवक बनविण्यात सेना अपक्ष नगरसेवकांची साथ मिळाली. मात्र काँग्रेसचे सात नगरसेवक असूनही काँग्रेसला फटका बसला आहे. 
 
२७ डिसेंबर रोजी नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारल्यानंतर जानेवारी रोजीची सभा बोलाविली होती. या सभेत उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्यात आले. तर जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन स्वीकृत सदस्यांची नावे पक्षाने सुचित केली होती. त्यानुसार बुलडाणा नगर पालिकेत आजच्या सभेत २८ नगरसेवक नगराध्यक्ष असा २९ जणांचा पुर्ण कोरम होता. बुलडाणा नगराध्यक्ष नजमुन्नीसा बेगम मो.सज्जाद या पीठासीन अधिकारी होत्या. दुपारी १२ वाजेपर्यंत सेनेच्या वतीने विजय मधुकर जायभाये काँग्रेसचे वतीने यमुनाबाई शंकर काकस यांची उमेदवारी दाखल झाली. या वेळी यमुनाबाई काकस यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने विजय मधुकर जायभाये यांची अविरोध निवड करण्यात आली. 
 
जळगावात भाजपा काँग्रेसचा स्वीकृत सदस्य : जळगावजामोद नगर पालिकेत काँग्रेसकडून नितीन ढगे, डॉ.किशोर केला,अजहर देशमुख, युनुसुखान रऊफ खान, अॅड.संदीप रमेश मानकर,लता कृष्णराव तायडे, अॅड.अमर रामभाऊ पाचपोर, अॅड.दीपक भिकाजी इंगळे यांंनी तर भाजपाचे वतीने मांगीलाल चौधरी यांचे उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल झाले होते. अॅड.अमर पाचपाेर, दीपक इंगळे लता तायडे यांचे अर्ज नामंजूर झाले. त्यानंतर गट नेत्याने नितीन ढगे यांचे नावाचे पत्र अध्यासी अधिकारी यांना दिल्यानंतर नितीन ढगे मांगीलाल चौधरी यांचेत लढत झाली. ढगे यांना तर मांगीलाल भंसाली यांना ११ मते मिळाली. तर स्वीकृत सदस्यपदी भाजपाचे निलेश शर्मा तर काँग्रेसचे अॅड.संदीप मानकर यांची निवड झाली. या निवडणुकीत भारिप बमसंचे नगरसेवक संजय पारवे हे तटस्थ होते. नगराध्यक्षा सीमा डोबे,यांनी अध्यासी अधिकारी म्हणुन तर सहायक अधिकारी म्हणुन मुख्याधिकारी डॅा.प्रशांत शेळके,नायब तहसीलदार जगदीश दिक्षित यांनी काम पाहिले. 
 
मलकापूर उपाध्यक्षपदी हाजी रशीदखाँ जमादार : मलकापूरनगर पालिकेच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे हाजी रशीदखाँ जमादार यांची तर स्वीकृत सदस्यपदी काँग्रेसचे नारायणदास निहलानी, दिलीपभाऊ देशमुख प्रा.डॉ.अनिल खर्चे यांची निवड करण्यात आली. काँग्रेस पक्षाकडुन उपाध्यक्ष पदाकरता हाजी रशीदखाँ जमादार यांचे दोन अर्ज दाखल झाले होते. तर स्वीकृत नगरसेवक पदाकरता १७ अर्ज छाणनीनंतर जिल्हाधिकारी यांनी पाठविले होते. यादी गटनेते राजेंद्र वाडेकर यांचेकडे सुपूर्द झाल्यानंतर त्यांनी सुचवल्यानुसार स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली. एमआयएमचे गटनेते गैरहजर होते. इमरानखाँ रशीदखाँ यांचा तर मलकापूर नगर विकास आघाडीचे वतीने निरंक माहिती आल्याने शंकरराव पाटील यांचा अर्ज बाद झाला. 
 
बुलडाण्याचे स्वीकृत नगरसेवक 
नांदुरा उपाध्यक्ष पदी शिवसेनेचे लाला इंगळे यांची तर स्वीकृत सदस्यपदी आघाडीचे श्रीधर बुरुकले , महेश चांडक यांची अविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीचे कामकाज नगर पालिका सभागृहात करण्यात आली. या वेळी नगराध्यक्षा रजनी जवरे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. उपाध्यक्षपदासाठी निवृत्ती उर्फ लाला इंगळे यांचा एकमेव अर्ज होता. तर स्वीकृत सदस्यपदासाठी महेश रमणलाल चांडक, श्याम केशवराव राखोंडे, श्रीधर ओंकार बुरुकले रवींद्र प्रल्हाद राणे यांचे अर्ज होतेे. अकोट विकास आघाडीचे राजेश एकडे यांच्या शिफारशीवरून
स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली. 
 
बुलडाणा नगर पालिकेमध्ये स्वीकृत सदस्य होण्यासाठी भारिप बमसंचे दोन सदस्य असतांनाही मो.सज्जाद अ.खालीद यांना सदस्यांचे समर्थन मिळाले. तर सेनेचे १० सदस्य असतांना संजय गायकवाड यांना मते भाजपचे पाचच सदस्य असतांना उदय देशपांडे यांना मते मिळाली. एकुण २३ सदस्यांचे समर्थन मिळाल्याने तीन सदस्यांची निवड करण्यात आली. काँग्रेसला फटका
कशाचा बसला ही चिंतनीय बाब आहे. 
 
खामगावच्या नगर पालिका उपाध्यक्षपदी संजय पुरवार 
खामगाव - नगर पालिकेच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाचे नगरसेवक संजय उर्फ मुन्ना पुरवार यांनी १० मतांनी विजय संपादन केला. येथील नगर पालिकेची सर्वसाधारण सभा जानेवारी रोजी नगर पालिकेच्या सभागृहात बोलाविण्यात आली होती.या सभेत अध्यासी अधिकारी म्हणुन अनिता वैभव डवरे यांनी काम पाहिले. सहाय मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांनी केले. उपाध्यक्ष पदासाठी भाजपाचे वतीने संजय पुरवार तर काँग्रेसच्या वतीने इब्राहीम कंडक्टर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. पुरवार यांना २१ तर इब्राहीम कंडक्टर यांना १२ मते मिळाली. तीन स्वीकृत नगरसेवकांमध्ये भाजपाचे वतीने किशोर भोसले, संदीप वर्मा तर काँग्रेसच्या वतीने माजी नगराध्यक्षा सरस्वती खाचणे या तिघांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. या तिघांची अविरोध निवड झाली. या वेळी भाजपा उपाध्यक्ष संजय पुरवार स्वीकृत सदस्य किशोर भोसले संदीप वर्मा यांचे आ.आकाश फुंडकर यांनी तर तिनही स्वीकृत सदस्य उपाध्यक्षांचे स्वागत नगराध्यक्षा अनिता डवरे यांनी केले.
 
 शेगाव नगर पालिकेच्या उपाध्यक्षपदी वर्षा ढमाळ 
शेगाव - आज पार पडलेल्या नगर परिषदेच्या उपाध्यक्ष स्वीकृत सदस्यपदाच्या निवडणुकीत उपाध्यक्षपदी भाजपाच्या नगरसेविका वर्षा दीपक ढमाळ यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी एमआयएमचे दोन नगरसेवक मात्र या निवडणूकीत तटस्थ राहिले. तर या निवडणुकीत स्वीकृत सदस्य पदाच्या निवडणुकीत भाजपाचे विजयबाप्पु देशमुख, प्रदीप सांगळे शिवाजी बुरूंगले यांची निवड करण्यात आली. येथील नगर पालिकेच्या सभागृहात उपाध्यक्ष स्वीकृत नगर सेवकांची निवडणुक पार पडली. या निवडणुकीत भाजपाकडून वर्षा दीपक ढमाळ यांनी तर शिवसेनेकडून आशिष दामोदर गणगणे यांनी अर्ज दाखल केला. या निवडणुकीत नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केले. या निवडणुकीत भाजपाच्या वर्षा ढमाळ यांची निवड करण्यात आली असून त्यांना १५ मते मिळाली.
बातम्या आणखी आहेत...