आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्ष्यांना पाण्यासोबत खाद्याची सोय बनतेय लोकचळवळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पक्ष्यांसाठी लावण्यात आलेले पिण्याच्या पाण्याचे भांडे. - Divya Marathi
पक्ष्यांसाठी लावण्यात आलेले पिण्याच्या पाण्याचे भांडे.
बुलडाणा- येथील वन्यजीव सोयरे ग्रुपने पक्ष्यांच्या खाद्याची व्यवस्था करणे सुरू केले आहे. त्यासोबतच हा उपक्रम जिल्ह्यातील विविध ठिकाणी राबवला जात अाहे. त्यामुळे पक्ष्यांना पाण्यासह खाद्याची सोय करण्याचा उपक्रम एक लोकचळवळ म्हणून उभी होत आहे.
 
येथील वन्यजीव सोयरे यांनी १२ मार्च रोजी होळीचे औचित्य साधून सकाळी ते दुपारी वाजेपर्यंत ज्ञानगंगा अभयारण्यात जाऊन १५ ठिकाणी मातीचे पॉट लावले. याद्वारे पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. पण वनात पक्ष्यांना खायला पाहिजे तेवढे अन्न नसल्यामुळे भटकंतीचा विचार करून वन्यजीव सोयरे यांनी पक्ष्यांना खाद्याची सोय करायचा विचार केला. त्यानुसार दर रविवारी वन्यजीव सोयरेंनी लावलेल्या पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या पॉट खाली जेवढे शक्य होईल तेवढे तांदूळ टाकण्यास सुरुवात केली आहे. याद्वारे पक्ष्यांच्या खाद्याची ही सोय होणार असून पक्ष्यांची भटकंती थांबण्यास मदत होत आहे. त्याप्रमाणे ही चळवळ हळूहळू लोक चळवळ होत असून संग्रामपूर तालुक्यातील तालुका पत्रकार संघाने एप्रिल रोजी गावालागतच्या परिसरात झाडांवर पिण्याच्या पाण्याने भरलेल्या १०० कुंड्या लावल्या. तसेच खामगांव येथील टिळक राष्ट्रीय विद्यालयात इयत्ता व्या वर्गातील रंगपंचमीच्या वेळी विद्यार्थ्यांनी रासायनिक रंगाची उधळन करता ते पैसे वर्ग नायक निशा सावरकर यश मुंग्यालकर यांच्याकडे जमा करून एप्रिल रोजी त्या पैश्यातून पक्ष्यांकरीता पाण्याची खाऊची सोय केली. 
 
खाद्य टाकण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन 
ज्ञानगंगा अभयारण्यातून जाताना पाण्याच्या पॉटमध्ये पाणी आणि पॉट खाली पक्ष्यांसाठी खाद्य टाकावे. ज्यांना ते शक्य नाही त्यांनी वन्यजीव सोयरे सागर आवटे, नितीन व्यवहारे, नितीन श्रीवास, सूरज वाडेकर, जयंत हिंगे आणि गणेश श्रीवास्तव यांच्याशी संपर्क साधावा. - नितीन श्रीवास्तव. 
बातम्या आणखी आहेत...