आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळाबाजार, घरगुती सिलिंडरच्या गॅसवर शिजतेय हॉटेलमधील अन्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - आधार लिंकिंग करणाऱ्यांना मिळणारे अनुदानित गॅस सिलिंडरचा वापर हॉटेल व्यावसायिक मोठया प्रमाणात करत असून, व्यावसायिक सिलिंडरवर मोठया प्रमाणात आवक कमी होत आहे. तर दुसरीकडे अनेकवेळा गॅस सिलिंडरचे अनुदान ग्राहकास मिळत नसल्याच्या तक्रारीही होत आहे. मात्र,गॅस असो वा पेट्रोल यावर पुरवठा अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने सर्वकाही आलबेल असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे दर हे
वेळोवेळी कमी अधिक होत आहेत. नुकतेच सिलिंडरचे भाव वाढले आहे. त्या वाढलेल्या दरानुसार १५० रुपयांपर्यंतचे अनुदान आधार लिंक असलेल्या लाभार्थी ग्राहकांच्या खात्यात जमा होत आहे.
घरगुती वापरासाठी असलेला हा गॅस सध्या विविध ठिकाणी हॉटेल व्यावसायिक वापरत असल्याचे दिसत आहे. पूर्वी अनेक वेळा पुरवठा विभागाने धाड टाकून गॅस सिलिंडर जमा केले होते. परंतु, या मध्ये पुढे काहीच झाले नाही. तहसीलमधील पुरवठा विभाग अशा धाडी टाकत होते. चार ते पाच वर्षापूर्वी बुलडाण्यात धाडी टाकण्यात आल्या होत्या. तेव्हा मोठया हॉटेलमधून असा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर खामगावातही असाच प्रकार उघडकीस आला होता. सध्या कोणत्याच हॉटेलची तपासणी होत नसल्याने हॉटेल व्यावसायिक मजेत आहे. तर
दुसरीकडे अनुदानाचे सिलिंडर संपल्यानंतर जादा दराने सिलिंडर खरेदी करण्याची वेळ महिलांवर येत आहे.

अनुदानाचा घोळ कायमच
जिल्ह्याततीन गॅस कंपन्यांमार्फत सिलिंडरचे वितरण करण्यात येते. जिल्ह्यात तीन गॅस एजन्सी २२ डिलर मार्फत गॅस वितरीत करतात. काही ठिकाणी या बाहेरुन गॅस बोलाविण्यात येतो. सध्या जिल्ह्यात जवळपास तीन लाख ग्राहक असून या मध्ये वाढ हाेऊन साडेतीन लाखापर्यंत पोहचू शकते.आधार कार्डाचे लिंकिंग ज्याने केले आहे.
अशा खातेदारांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा हाेते. परंतु ही रक्कम केव्हा जमा करावी याबाबत ग्राहकांना माहिती दिल्या जात नाही. तर या बाबत तक्रार करणाऱ्यांना पुरवठा विभाग निश्चित काही सांगू शकत नाही. पेट्रोल पंप असो वा गॅस असो सर्व कारभार विक्री अधिकारी पाहत असल्याने पुरवठा विभाग फक्त नामधारी आहे. अनेकवेळा अधिकाऱ्यांना नामुष्की सहन करावी लागते. फक्त माहिती कळवल्याशिवाय काहीच करु शकत
नसल्याने महसूल अधिकारी पुरवठ्याचे कामाला त्रस्त होत आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही गॅस सिलिंडरची समस्या अनेकांना भेडसावत आहे. घरगुती सिलिंडर गॅसचा वापर
हॉटेलमध्ये केला जात असल्यामुळे ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर तीन-चार दिवस सिलिंडर घरपोच मिळत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. दरम्यान, घरपोच सिलिंडरच्या देवाण-घेवाणीत वेळ मारून नेला जातो. तसेच घरपोच सिलिंडर दिले असता ग्राहकांकडून जास्तीचे पैसे आकारण्यात येतात. वास्तविक ज्या किंमतीमध्ये सिलिंडर गॅस एजन्सीमध्ये मिळतो, त्याच भावामध्ये घरपोच सिलिंडर आणून देण्याची व्यवस्था संबंधित एजन्सीला बंधनकारक आहे.
व्यावसायिक गॅसची माहिती नाही
अनेक गॅस लाभार्थी आपल्या अनुदानाबाबत पुरवठा विभागात तक्रारी करतात. परंतु, पुरवठा विभागाकडे गॅस असो वा पेट्रोल कंपन्या असो, या बाबत कोणतीही कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. फक्त कंपनीला कळविण्याचे अधिकार आहेत. बाकी सर्व काम विक्री अधिकारी पाहत असल्याने गॅस अनुदानाचा घोळ कायम असून, आधार लिंक शिवाय अनुदान मिळणे शक्य नाही. त्यातच व्यावसायिक गॅस बाबत माहितीही कळविल्या जात नसल्याची पुरवठा विभागाची माहिती आहे.
विनाअनुदानित सिलिंडर उपलब्ध घरगुती गॅस ग्राहकांसाठी अनुदानित गॅस मिळत आहे. तर काहींना विना अनुदानित गॅस सिलिंडर उपलब्ध आहेत. तर व्यावसायिक गॅस वेगळया दरात उपलब्ध आहे. असे सिलिंडरची विक्री कमी प्रमाणात होत आहे. एकट्या बुलडाणा शहरासह लगतच्या रस्त्यावर जवळपास ५० पेक्षा अधिक शाकाहारी मांसाहारी खानावळी हाॅटेल आहेत. जिल्ह्यात हा आकडा हजारोंच्या जवळपास जातो. तर धाब्यावर बहुतांश ठिकाणी
लाकडाचा दगडी कोळश्याचा वापर होतो.
बातम्या आणखी आहेत...