आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतमालाच्या खरेदी विक्रीतून हाेताेय काळा पैसा पांढरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - शेतमालाच्या खरेदीसाठी चलनातून बाद झालेल्या पाचशे अाणि हजार रुपयांच्या नाेटा वापरून काळा पैसा पांढरा करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली अाहे. काही शेतकऱ्यांकडून जादा दराने शेतमालाची खरेदी करुन त्यांना नाेटबंदीच्या पूर्वीच्या तारखेत पावती देण्यात येत असल्याचे समजते. पावतीवर मात्र प्रत्यक्ष खरेदीपेक्षा ३० ते ४० टक्के जादा शेतमाल खरेदीचा उल्लेख करण्यात येताे. या गाेरखधंद्यात बुलडाणा जिल्हयातील सावकार असलेला लाेकप्रतिनिधी आणि अकाेला जिल्हयातील व्यापाऱ्यांची अभद्र युती असल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. या सर्व प्रक्रियेत लाेकप्रतिनिधी व्यापारी स्वत:कडील काळ्या, बेहिशाेबी पैशाची शेतमालात गुंतवणूक करीत असल्याचा दावा सूत्रांकडून करण्यात येत अाहे.
यंदा जिल्हयात दमदार पाऊस झाल्याने पिकं समाधानकारक झाली. काही ठिकाणी १० अाॅगस्टनंतर पावसाने दडी मारल्याने साेयाबीनला फटका बसला असला, तरी बहुताश: ठिकाणी उत्पादन झाले. कापूस अाणि इतर पिकांचे उत्पादन गत तीन वर्षांच्या तुलनेने यंदा वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. दरम्यान, नाेव्हेंबर राेजी पाचशे अाणि हजार रुपयांच्या नाेटा चलनातून बाद करण्यात येत असल्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. काहीच दिवसात मजुरी अाणि इतर दैनंदिन गरजा भागवण्यासाठी साठवून ठेवलेला शेतकऱ्यांकडील पैसा संपला. बँकेतूही स्वत:च्या खात्यातून ठराविक रक्कमच काढता येत असल्याने शेतकऱ्यांची गैरसाेय झाली.

नाेटबंदीचा सर्वाधिक धसका भ्रष्टप्रवृत्ती अाणि काळा पैसा असलेल्यांनी घेतला. अवैध सावकारी करणाऱ्या काही लाेकप्रतिनिधींचीही चांगलीच पंचाईत झाली. नाेट बंदीचा निर्णय जाहीर करताना सरकारने जुन्या पाचशे अाणि हजार रुपयांच्या नाेटा ३१ डिसेंबरपर्यंत बँकेत जमा करण्याची मुदत दिली. मात्र अडीच लाखांपेक्षा जास्त रक्कमेच्या जुन्या पाचशे अािण हजार रुपयांच्या नाेटा जमा करणाऱ्यांची माहिती बँकेतून थेट अायकर विभागाकडे सादर हाेण्याची व्यवस्थाही सरकारने केली. त्यामुळे काळ्यांची साठवण केलेले लाेकप्रतिनिधी आणि या व्यापाऱ्यांची प्रथम गाेची झाली. मात्र नंतर त्यांनी काळा पैसा पांढरा करण्यासाठीचा फंडा शाेधून काढला. यंदा चांगला पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन भरपूर झाले. त्यामुळे त्यांनी काही शेतकऱ्यांकडून चढ्या दराने शेतमालाची खरेदी केली. यासाठी मात्र शेतकऱ्यांना जुन्या नाेटा देण्यात अाल्या.

३१ डिसेंबरपर्यंत जुन्या नाेटा बदलण्याची अाणि अडीच लाखांपर्यंत काेणतीच चाैकशी (शेतकऱ्यांची चाैकशी हाेण्याचा प्रश्नच नव्हता) हाेणार नसल्याने या शेतकऱ्यांनी नाेटा स्वीकारल्या. अाता पैशाच्या बदल्यात जवळ शेतमाल जमा झाल्याने हे सावकार असलेल्या लाेकप्रतिनिधी अाणि व्यापाऱ्यांनी काही अंशी नि:श्वास साेडला. शेतमाल यशावकाश विकता येईल, या विचारात असलेल्या या लाेकप्रतिनिधी अाणि व्यापाऱ्यांवर पाळत ठेवून त्यांच्या या गाेरखधंद्यांची सखाेल चाैकशी केल्यास माेठे घबाड बाहेर येईल, असा दावा सूत्रांनी केला अाहे. दरम्यान, चलनातून बाद झालेल्या पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बदलण्यासाठी ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या नोटा आहेत, असे धनदांडगे काही गोरगरीब जनतेच्या बँकेतील खात्याचा वापर करत असल्याच्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तसेच शहरी स्लम एरिया भागातून ऐकिवात आहे. या गोरगरीबांना काही पैशांचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात आेढत आहेत.

कापसाला दिला जातोय विक्रमी भाव
पांढरे साेने असलेल्या कापूस विक्रीच्या माध्यमातून काळा पैसा पांढारा करण्यात अाला. या लाेकप्रतिनिधीने तेल्हारा तालुक्यातील काही व्यापाऱ्यांना हाताशी धरले. या व्यापाऱ्यांनी तर जुन्या नाेटा देऊन काही शेतकऱ्यांकडून हजार ५०० ते हजार रुपये प्रती क्विंटल कापूस खरेदी केला. नंतर ही माहिती वाऱ्यासारखी सर्वदूर पसरल्याने व्यवहार थांबवण्यात अाले. मात्र ताेपर्यंत लाेकप्रतिनिधी व्यापाऱ्यांचे उद्दिष्ट बऱ्यापैकी साध्य झाले.

जादा दराने खरेदीचा लावला सपाटाच
काळ्या, बेहिशाेबी रक्कमेतून शेतमाल खरेदीचा सपाटाच या सावकार असलेल्या लाेकप्रतिनिधीने लावला. दोन हजार ८०० ते हजार रूपये दर असलेल्या साेयाबीनची खरेदी ते हजार ५०० रुपये दराने करण्यात अाली. या दराने शेतमाल खरेदी केलेल्या काही शेतकऱ्यांना चलनातून बाद झालेल्या पाचशे हजार रुपयांच्या नाेटा देण्यात अाल्या. तसेच या शेतकऱ्यांना पावतीही देण्यात अाली. मात्र या पावतीवर नाेटाबंदीच्या िनर्णयाच्या पूर्वीची अर्थात नाेव्हेंबरच्या पूर्वीच्या तारीख नाेंदवण्यात अाली. असा प्रकार काही ठिकाणी झाला.

व्यापाऱ्यांना ‘अाले अच्छे दिन’
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतमालाच्या खरेदीतून काळा पैसा पांढरा करण्याच्या या गाेरखधंद्यांमुळे व्यवसाय बंद पडलेल्या काही कापूस धान्य व्यापाऱ्यांना अच्छे दिन अाले. बुलडाणा जिल्हा हे केंद्र असलेल्या या गाेरखधंद्याचे धागेदाेरे अकाेला जिल्हयातही पाेहाेचले अाहेत. या व्यापाऱ्यांनी बाळापूर, निंबा, अडसूळ, तेल्हारा, हिवरखेड अाकाेट तालुक्यातील काही शेतकऱ्यांकडून शेतमाल घेऊन ताे या लाेकप्रतिनिधीला विकल्याचे समजते. त्यामुळे व्यापाऱ्यांना कमिशनच्या रुपात भरपूर पैसा मिळाला.

माेजमाप हाेत राहिल
एरव्ही काेणावर सहज विश्वास ठेवणाऱ्या या लाेकप्रतिनिधीने अािण त्याच्या कर्मचाऱ्यांंनी शेतमालाचे माेजमाप करताच माल ताब्यात घेऊन गाेदामातून ठेवला. शेतमाल किती अाहे तेवढे सांगा, पैसे पावती घ्या; माेजमाप हाेत राहिल, असे हा लाेकप्रतिनिधी त्याचे कर्मचारी म्हणत असल्याचे काहींनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...