आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा जाणवतोय तुटवडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा- अपघातांमधीलजखमी, गर्भवती माता तसेच इतर स्वरुपाच्या रुग्णांना नवे जीवन देण्यासाठी रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज असते. मात्र, येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीला नागरिकांकडून अपेक्षित प्रमाणात रक्तपुरवठा होत नसल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.

सद्य:स्थितीत सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्ताच्या केवळ ३६ पिशव्याच उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. रक्ताच्या तुटवड्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसह रुग्णालय प्रशासनासमोर समस्या निर्माण झाली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना हजारो रुपये खर्च करून खासगी रक्तपेढीतून रक्त विकत घेऊन गरज भागवावी लागत आहे.

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. वेळेवर रुग्णास रक्त मिळाल्यास त्याचे प्राण वाचून त्याला नवे जीवन प्राप्त होते. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात बुलडाणा परिसरासह धाड, मोताळा मराठवाड्यातील अनेक गर्भवती माता प्रसुतीसाठी येतात. तसेच अपघातात गंभीर जखमी रुग्णांनाही उपचारासाठी दाखल करण्यात येते. त्यामुळे वेळप्रसंगी त्यांना रक्ताची नितांत आवश्यकता भासत असते. मात्र, काही दिवसांपासून अावश्यक त्या प्रमाणात रक्तदात्यांकडून रक्त मिळत नसल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होत आहे. अनेक वेळा नातेवाईकांना रक्तदात्यांचा शोध घ्यावा लागत आहे. काहींना हजारो रुपये खर्च करून खासगी रक्तपेढीतून रक्त विकत घ्यावे लागत आहे. सद्य:स्थितीत सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीत विविध रक्तगटाच्या केवळ ३६ पिशव्याच उपलब्ध आहेत.

त्यामध्ये "ए पॉझीटीव्ह' रक्तगटाची एकही पिशवी उपलब्ध नाही. तर "एबी निगेटिव्ह' "ओ निगेटिव्ह'ची प्रत्येकी एक पिशवी उपलब्ध आहे. या रक्तपेढीची रक्त साठवण करण्याची क्षमता जास्त असली तरी रक्तदान शिबिरांमधून आवश्यक तेवढे रक्त दात्यांकडून मिळत नाही. सामान्य रुग्णालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरांमध्ये रक्तदाते सहभागी होत नाहीत. त्यामुळे रुग्णांच्या मागणीनुसार रक्त पुरवठा करता येत नाही. रक्तदानातून जमा केलेले रक्त हे केवळ ३५ दिवसापर्यंतच ठेवण्यात येते. रुग्णालयाच्या वतीने वारंवार रक्तदान शिबिरे घेऊन साठा उपलब्ध केला जातो. या रक्तपेढीला केवळ १५ ऑगस्ट २६ जानेवारीला रक्तदान शिबिरासाठी निमंत्रण देण्यात येते. इतर वेळी या रक्तपेढीस अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे रक्तपेढीत अपेक्षित प्रमाणात रक्तसाठा जमा होत नाही. या रक्तपेढीतून दारिद्र्यरेषेखालील असलेल्या रुग्णांना मोफत रक्ताचा पुरवठा करण्यात येतो.

प्रत्येकाने रक्तदान करणे महत्त्वाचे
रक्तदानहे सर्व श्रेष्ठ रक्तदान आहे. रक्तदात्यांनी शासकीय रक्तपेढीत रक्तदान करणे गरजेचे आहे. रक्तदात्यांचा सहभाग वाढल्यास सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तसाठा वाढण्यास मदत होईल. त्यामुळे रक्तदात्यांनी शासकीय रक्तपेढीत रक्तदान करायला हवे. डॉ.एस. आर.
सपकाळ, तंत्रज्ञ

संस्था, संघटनांची हवी मदत
खासगीरक्तपेढ्यांकडे रक्तदात्यांचा कल जास्त असतो. तसेच विविध राजकीय नेते संस्थाही खासगी रक्तपेढीस निमंत्रण देऊन रक्तदान शिबिरांचे आयोजन करतात. मात्र, या शिबिरासाठी अपेक्षित प्रमाणात सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीस निमंत्रण दिले जात नाही. सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीला प्राधान्य देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, रक्ताचे दर आणि रक्त पेढील असलेले रक्ताचे प्रमाण...