आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसीबीने वर्षभरामध्ये केली 34 लाचखोरांविरुद्ध कारवाई, महसूलची सर्वाधिक प्रकरणे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धाड - विवध शासकीय निमशासकीय कार्यालयात सामान्य जनतेच्या समस्या अडचणी सोडवण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाते. परंतु लोभी मानसिकतेच्या लोकसेवकांमुळे सामान्य जनतेला आपली कामे अडचणींचा निपटारा करताना त्रास होतो. या त्रासाला कंटाळून अनेकजण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा आसरा घेऊन अशा लोभी अधिकारी कर्मचाऱ्यांना कायमचा धडा शिकवतात. जिल्ह्यात वर्ष २०१६ मध्ये एसीबीच्या पथकाने ३४ कर्मचाऱ्यांवर तक्रारदारांच्या मदतीने सापळा रचून यशस्वी कारवाई केली. यामध्ये वर्ग चे सहा तर २८ वर्ग चे लोकसेवक, अधिकाऱ्यांंचा समावेश आहे. 
 
सामान्य नागरिकांना विविध वैयक्तिक शासकीय कामांसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. याउपरही कामे मार्गी लागल्यास संबंधित कर्मचाऱ्याची द्रव्यरुपाची मागणीही वेळप्रसंगी पूर्ण करावी लागते. समाजात बोकाळणाऱ्या या भ्रष्टाचारावर प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची निर्मिती केली असून या विभागाद्वारे काही प्रमाणात लाचखोर कर्मचाऱ्यावर अंकुश लावण्याचे काम होत असतेे. मात्र भ्रष्टाचाराची स्थिती ऐवढी गंभीर झालेली आहे की शासकीय निमशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेतन, भत्ते, वैद्यकीय देयके प्रतिपूर्तीकरीतासुद्धा लाचेचा आसरा घ्यावा लागतो. सन २०१६ मध्ये जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने नागरिकांच्या तक्रारीवरुन सापळा रचून तब्बल ३४ कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून लाख ४५ हजार ५४० रुपये लाचेची रक्कमही जप्त करण्यात आली. 

जिल्ह्यातील तालुक्यात २४ केसेस करण्यात आल्या असून यात सर्वाधिक बुलडाणा तालुक्यात तसेच खामगाव ३, शेगाव १, जळगाव २, चिखली १, मेहकर ४, लोणार ३, देऊळगावराजा १, सिंदखेडराजा अशा एकूण प्रकरणात ३४ कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. 

अधिकारीही बनले आता लाचखोर 
जिल्ह्यात करण्यात आलेल्या एकूण २४ प्रकरणापैकी वर्ग च्या लाचखोर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये बुलडाणा येथील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सुभाष चव्हाण, पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. भिकमसिंग डोंगरसिंग राजपुत, वैद्यकीय अधिकारी डॉ. चारुशिला पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय दयाराम चव्हाण, मोटार वाहन निरिक्षक चंद्रविलास हरिभाऊ जमदाडे, मलकापूर तालुका कृषी अधिकारी विजय लक्ष्मण खोंदील या लोकसेवकांचा कारवाई झालेल्यांमध्ये समावेश आहे. 

नागरिकांनी तक्रार केल्यास निश्चितच कारवाई करू 
- विविध विभागातीलभ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. कोणत्याही शासकीय, निमशासकीय विभागातील कर्मचारी किंवा अधिकारी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी बिनदिक्कत लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दाखल करावी. या तक्रारीवर निश्चित कारवाई करण्यात येईल. व्ही.अार. पाटील, पोलिस उपअधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा 

नागरिकांनी तक्रार केल्यास निश्चितच कारवाई करू 
- विविध विभागातीलभ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. कोणत्याही शासकीय, निमशासकीय विभागातील कर्मचारी किंवा अधिकारी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी बिनदिक्कत लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दाखल करावी. या तक्रारीवर निश्चित कारवाई करण्यात येईल. व्ही.अार. पाटील, पोलिस उपअधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा 
 
बातम्या आणखी आहेत...