आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडाणा ‘प्लास्टिक मुक्ती’चे आदेश पायदळी, कचऱ्याचे सर्वत्र साचले ढीग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - प्लास्टिक खाल्ल्याने जनावरांचा मृत्यू झाल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले असतानाही शहर प्लास्टिक मुक्त करण्याच्या आदेशाचा बट्ट्याबोळ होत असल्याचे निदर्शनास येत अाहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या सामाजिक दायित्वाचे भान ठेवणे गरजेचे आहे. त्यांची साधी चूक जनावरांसह नागरिकांच्या जिवावर बेतते ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे.
 
नगरपालिका हद्दीत घरातील टाकाऊ अन्न पदार्थ रस्त्यावर टाकल्याने रस्त्यावरील मोकाट जनावरे त्याचे सेवन करतात. त्यात त्यासोबत टाकलेले प्लास्टिक पिशव्या जनावरांच्या पोटात जातात. परिणामी त्यात त्या जनावरांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येते नाही. 
 
शहरातील विविध भागात मोकाट जनावरांचा वावर असून, यामुळे कित्येकदा रस्त्यावरील वाहतूक ठप्प होते. मोकाट जनावरे अन्न खाण्यासाठी मिळते. यासाठी दररोज सकाळी घरोघरी फिरतात. नागरिकांनी टाकलेले अन्न पदार्थ सेवन करतात. शहरात चारा उपलब्ध नसल्याने जनावरांना नागरिकांनी टाकलेल्या अन्न पदार्थावर अवलंबून राहावे लागते. शहराच्या बऱ्याच भागात टाकाऊ अन्न पदार्थांना प्लास्टिकच्या पिशव्यात टाकून रस्त्यावर फेकले जाते. मोकाट जनावरे हे अन्न खाण्याच्या नादात प्लास्टिक पिशव्या खातात. प्लास्टिक जनावरांच्या पोटात गेल्यानंतर पोट फुगते. प्लास्टिक बाहेर काढण्यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागते. ही बाब खर्चिक असल्याने मोकाट जनावरांची शस्त्रक्रिया करण्यासाठी कोणी पुढे येत नाहीत. परिणामी जनावरे दगावतात. मोकाट जनावरांना शस्त्रक्रिया करण्यासाठी सामाजिक संघटनांनी पुढे येणे गरजेचे आहे.

 
विषारी अन्न सेवनाने गायींचा झाला मृत्यू 
शहरात काही दिवसांपूर्वी काही गाई मरण पावल्या होत्या. त्या गाईंची प्रशासनाने उत्तरीय तपासणी केली. त्यात या गायीच्या पोटात प्लास्टिकमधील विषारी अन्न खाल्ल्याचे निष्पन्न झाले होते. 
बातम्या आणखी आहेत...