आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सुधारित अंदाजपत्रक सादर करा’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - सन२०१६-१७ या वर्षाचे जलयुक्त शिवार अभियानअतंर्गत सुधारीत कामांचे अंदाजपत्रक ३० मे पर्यंत सादर करावे. तसेच सन२०७-१८चा आराखडा तातडीने सादर करावा अशा सूचना जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी शुकवारी अाढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या. जलयुक्त शिवार अंतर्गत जास्तीत जास्त कामे घेण्याची सूचना त्यांनी केली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयांचे उदिष्ट वेळेत पूर्ण करावे. प्रलंबित कृषी पंपांना वीज जोडणी करण्याबरोबरच सोलर पंपांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. मनरेगा नरेगा अंतर्गत असणाऱ्या विहिरींची कामे वेळेत पूर्ण करावीत, असेही ते म्हणाले. 
 
जिल्हाधिकारी बैठकीत म्हणाले कि, लोकहिताच्या दृष्टीने शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना प्राधान्याने राबविण्यावर विभागप्रमुखांनी भर द्यावा. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी स्वत: जाऊन पाहणी करावी. कामामध्ये हयगाई होता कामा नये. प्रत्येक काम वेळेतच पूर्ण झाले पाहिजे, अशा सूचना जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता अंकुर देसाई, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोदसिंग दुबे, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक विजय माने आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

पालकसचिव पुढील अाठवड्यात अकाेल्यात 
जिल्हयाचे पालक सचिव बलदेवसिंह हे विविध विषयांबाबत आढावा घेण्यासाठी ३१ मे राेजी अकाेल्यात येणार अाहेत. बैठक घेणार आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी विविध योजनांच्या अमलबजावणीचा आढावा घेतला. वृक्षलागवडीसाठी जिल्हयाला दिलेले उदिष्ट पूर्ण करायचे असून त्यासाठी विभागप्रमुखांनी सूक्ष्म नियोजन करावे. वृक्षलागवडीची माहिती ऑनलाईन भरावयाची असल्याने सामाजिक वनीकरण विभागाला ही माहिती तातडीने द्यावी. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना, मागेल त्याला शेततळे, पिककर्ज वाटप, अपूर्ण सिंचन प्रकल्प, अवैध धार्मिक स्थळं, कुपोषण मुक्त अकोला, मुख्यमंत्री पेयजल योजना, सांसद आदर्श ग्राम, आमदार आदर्श ग्राम, अंगणवाडी विद्युत कनेक्शन, सेवा हमी कायदा याबाबत सविस्तर आढावा घेऊन विभागप्रमुखांना दक्षतेने काम करण्यास सांगितले. 
 
बातम्या आणखी आहेत...