आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडाणा जिल्हा नियोजन समितीमध्ये ग्रामीण मतदार संघाचे वर्चस्व, 29 पैकी 20 जागा बिनविरोध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर संग्रामपूर येथे एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त करण्यात आला. - Divya Marathi
जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर संग्रामपूर येथे एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त करण्यात आला.
बुलडाणा - जिल्हा नियोजन समितीच्या एकूण २९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत २० जागा बिनविरोध, तर उर्वरित नऊ जागांसाठी घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी १० ऑगस्ट रोजी पार पडली. यामध्ये ग्रामीण भागातून तर, नागरी भागातून उमेदवार विजयी झाले आहेत. 
 
जिल्हा नियोजन समिती एकूण निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी गुरुवारी नियोजन समिती सभागृहात सकाळी वाजता करण्यात आली. तीन टेबलवर झालेल्या मतमोजणीत जागांमध्ये ग्रामीणच्या नागरीच्या जागांचा समावेश होता. एकुण २९ जागांसाठी ही निवडणूक होती. त्यापैकी २० जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. यामध्ये ग्रामीणच्या १८ नागरीच्या जागांचा समावेश आहे. उर्वरित तीन जागांसाठी अर्ज आल्याने त्या जागेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 
 
या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्र. अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद देशमुख, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रमोद देशमुख, तहसीलदार सुरेश बगळे, तहसीलदार शैलेश काळे, सहा. पुरवठा अधिकारी राहुल खंडारे, नायब तहसीलदार सुरेश मोरे आदी उपस्थित होते. 
 
या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण मतदारसंघात एससी महिला प्रवर्गातून सिंधू पंडितराव खंडारे, दुसर बीड ता. सिं.राजा, शीला घनशीराम शिंपणे मु. टाकरखेड वायाळ, पो डिग्रस बु, ता. दे.राजा, उषा पांडुरंग सावरकर लासुरा, ता. शेगाव, एससी प्रवर्गातून महेंद्रकुमार श्रावण गवई आव्हा युनूसपूर, ता. मोताळा, सुनंदा हरिदास शिनगारे मिसाळवाडी, ता. चिखली, एसटी प्रवर्गातून डॉ. ज्योती शिवशंकर खेडेकर अंत्री खेडेकर, ता. चिखली, नामाप्र महिला राखीवमधून स्वाती राजेंद्र देवचे माटरगाव, ता. शेगाव, मनीषा नितीन पवार हिवरा बु, ता. मेहकर, रेणुका दिलीप वाघ शिवणी, ता. लोणार, जयश्री सुनील शेळके सुंदरखेड बुलडाणा, सर्वसाधारण महिला प्रवर्गातून सविता गणेश बाहेकर डोंगर खंडाळा, ता. बुलडाणा, कमल जालिंदर बुधवत मु. सोयगाव, ता. बुलडाणा, पूनम विजय राठोड मु. पिंपरखेड, ता. दे.राजा, सर्वसाधारण प्रवर्गातून मनोज देवानंद कायंदे दे.राजा, प्रमोद रमेश खोंद्रे सोनाळा, ता. संग्रामपूर, रियाजखाँ इलियासखाँ पठाण दे.मही, ता. दे.राजा, राजेश श्रीराम मापारी गायखेड ता. लोणार, शरद दत्तात्रय हाडे सवणा, ता. चिखली हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. 
 
नागरी मतदारसंघातून बिनविरोध निवडलेल्यांमध्ये नामाप्र महिला राखीत गट पुष्पा धुड बुलडाणा, नामाप्रमधून नंदन खेडेकर दे.राजा. या दोन शिवसेनेच्या नगरसेविका नगरसेवकांचा समावेश आहे. 
 
नागरी मतदार संघ विजयी उमेदवार 
नागरी मतदार संघाच्या झालेल्या निवडणुकीत एससी प्रवर्गातून रजनी जवरे नांदुरा नगराध्यक्ष, सर्वसाधारण महिला प्रवर्गातून अर्चना टाले खामगाव, सीमा डोबे जळगाव जा. नगराध्यक्षा, सर्वसाधारणमधून कासम गवळी मेहकर न.प. अध्यक्ष, राजेंद्र वाडेकर मलकापूर नगरसेवक. 
 
ग्रामीणमधून निवडून आलेले उमेदवार 
विजयी उमेदवारांमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गातून श्रीराम बाबुराव अवचार पिं.काळे, ता. जळगाव जामोद, राम शंकरराव जाधव साखरखेर्डा ता. सिं.राजा, राजेंद्र सदाशिव पळसकर डोणगाव, ता. मेहकर, मधुकर गोपाळ वडोदे निमगाव, ता. नांदुरा. 
बातम्या आणखी आहेत...