आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पन्नाशीकडे झुकलेल्या सोनिया ‘बुलडाणा क्वीन’; वेगवेगळ्या गटातील साैंदर्य स्पर्धेला प्रतिसाद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा- शहरात नुकत्याच झालेल्या बुलडाणा क्वीन स्पर्धेत १० ते १९, वीस ते ३० व ३१ ते ५० या वयोगटातील बुलडाणा क्वीनची निवड  दिमाखदार सोहळ्यातून करण्यात आली. विशेष म्हणजे तिसऱ्या वयाेगटात प्रथम येण्याचा मान पन्नाशी गाठलेल्या साेनिया सेठी यांनी मिळवला. मराठी अभिनेत्री मयुरी देशमुख, निर्माते मंदार देवस्थळी, दिपाली पाटील यांंचेहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. 


महिला, मुली व तरुणींसाठी बुलडाणा क्वीन २०१७ चे आयोजन प्लॅनेट आर्ट एंटरटेन्मेंटचे विदर्भ संचालक निलेश भोंडे यांनी केले होते. १६ नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या या स्पर्धेला महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. १९ नोव्हेंबर रोजी स्पर्धेच्या अंतिम फेरीला सुरुवात झाली. त्यापूर्वी रंगारंग कार्यक्रमासोबत रॅम्पवॉकचा सहभागही घेण्यात अाला होता.  मॉडेल्सच्या रॅम्पवॉकसह कलाकारांनीही नृत्याविष्काराचे सादरीकरण केले. 


या आहेत विजेत्या महिला
तीन वयोगटासाठी प्रत्येकी तीन बक्षिसे ठेवण्यात आली होती.वयोगट १० ते १९ वयोगटात कोमल मिश्रा ही प्रथम विजेता ठरली. बाल युवा सम्राज्ञी घोषित करण्यात आली. दुसरी सपना पवार व तिसरी रुपाली पवार ही विजेती ठरली. वयोगट २० ते ३० मध्ये चंचल परमार ही युवा सम्राज्ञी म्हणून घोषित करण्यात आली. द्वितीय शिवानी दाभाडे व तृतीय रसिका जाधव ही विजेती ठरली. वयोगट ३१ ते ५० मध्ये बुलडाणा सम्राज्ञी म्हणुन सोनिया सेठी या विजेत्या ठरल्या. द्वितीय क्रमांकावर स्वाती कन्हेर, तृतीय क्रमांकावर विजया चव्हाण या विजेत्या ठरल्या.

बातम्या आणखी आहेत...