आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तर बीडीअाेंच्या वेतन वाढीवर येणार गदा, सीसी कॅमेरा खरेदी घाेटाळा प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - सीसी टिव्ही कॅमेरा खरेदी घाेटाळयाप्रकरणाचा अंतीम अहवाल विभागीय अायुक्त करणार असल्याची मािहती सूत्रांकडून प्राप्त झाली असून, हा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार अाहे. या घाेटाळ्यात दाेषी अाढळून येणाऱ्या संबंधित गट विकास अधिकाऱ्यांच्या (बीडीअाे) वेतन वाढीवर गंडांतर येऊ शकते, अशी शक्यता प्रशासकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात अाहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीच्यावेळी विभागीय अायुक्त कार्यालयातील उपायुक्तांनी बीडीअाेंची जवळपास ३२ प्रश्नांच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया कशी पार पाडण्यात अाली, हे जाणून घेतले हाेते. या घाेटाळ्याची चाैकशी उपायुक्त करण्यात येणार असल्याची घाेषणा नागपूर हिवाळी अधिवेशनात ग्राम विकास मंत्र्यांनी केली हाेती. 
 
सीसी टिव्ही कॅमेरे जिल्हा नियाेजन समितीच्या नाविन्यपूर्ण याेजनेअंतर्गत सर्व पंचायत समितीस्तरावर खरेदी करण्यात अाले हाेते. याप्रकरणी अामदार रणधीर सावरकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. याबाबत त्यांनी राज्य विधी मंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नही विचारला हाेता. यावर ग्रामविकास मंत्र्यांद्वारे लेखी उत्तर देण्यात अाले. सी.सी.टीव्ही कॅमेरे खरेदी मध्ये गैर व्यवहार झाला असून या संदर्भात तक्रारी आल्या असल्याचे ग्रामविकास मंत्र्यांनी अंशतः मान्य केले हाेते. 

बीडीअाेंची दाेन वेळा झाली चाैकशी 
सीसी कॅमेराखरेदी घाेटाळ्यात बीडीअाेंची दाेन वेळा चाैकशी करण्यात अाली. पहिली चाैकशी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या अाठवड्यात दाेन दिवस अकाेल्यात झाली हाेता. उपायुक्ताच्या पथकाच्या या चाैकशी पथकामध्ये एकूण १२ अधिकारी हाेते. या पथकाने पुढील प्रश्नांसह एकूण ३२ प्रश्नांचा समावेश हाेता. त्यानंतर गत अाठड्यात बुधवारी दुसऱ्यांदा चाैकाशी झाली. 
या दाेन्ही चाैकशीच्या वेळी बीडीअाेंना किती निविदा काढण्यात अाल्या, एका पेक्षा जास्त निविदा काढल्या असल्यास त्याचे कारण काय, सीसीकॅमेरे खरेदी विभाजन करुन का करण्यात अाली अादी प्रश्न विचारण्यात अाले हाेते. 

निवडणुकीनंतर हाेणार सुनावणी 
सीसीटिव्हीकॅमेरा खरेदी घाेटाळ्याचा तपास उपायुक्तांच्या चमुकडून हाेत असून, काही दिवसांपूर्वी जिल्हयातील बिडीअाेंचे जबाबही नाेंदवण्यात अाले हाेते. त्यानंतर फेब्रुवारी राेजी उपायुक्तांच्या कक्षात सुनावणी झाली. सुनावणीच्या वेळी अायुक्त कार्यालयीन कामानिमित्त बाहेर गावी गेले हाेते. सध्या जिल्हा परिषद अािण महापािलका निवडणुकीत अधिकारी व्यस्त अाहेत. त्यामुळे निवडणुकीनंतर पुढील सुनावणी हाेणार अाहे. 

सीसीकॅमेरा खरेदी घाेटाळ्यात जिल्हा परिषद प्रशासनालाही विभागीय अायुक्त कार्यालयाला अहवाल सादर करावा लागणार अाहे. ही प्रक्रिया तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र सिंग यांच्या कार्यकाळात झाली हाेती. त्यामुळे अहवाल पाठवताना प्रशासन काेणाला वाचवते कि निष्पक्ष पाठवते, हे स्पष्ट हाईल. 
बातम्या आणखी आहेत...