आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कँडल मार्च काढून नगरपालिकेचे लघू व्यावसायिकांकडून श्राद्ध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेणबत्ती लावून पालिका प्रशासनाचा निषेध करताना व्यावसायिक. - Divya Marathi
मेणबत्ती लावून पालिका प्रशासनाचा निषेध करताना व्यावसायिक.
बुलडाणा - मागीलवर्षी डिसेबर महिन्यामध्ये उच्च न्यायालयाचा आदेश दाखवून स्मार्ट सिटी स्वच्छ बुलडाण्याच्या गप्पा मारून प्रशासनाने मलकापूर - चिखली महामार्गावरील लघु व्यावसायिकांचे अतिक्रमण हटविले. आज १० डिसेंबर रोजी त्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असल्यामुळे लघु व्यावसायीकांनी आपल्या जुन्या दुकानाच्या जागी कँडल लावून प्रशासनाचे वर्षश्राद्ध केले.
शहरातील अनेक सुशिक्षीत बेरोजगारांनी नगर पालिका महसूलच्या जागेत अतिक्रमण करून लहान- सहान व्यवसाय सुरू केले होते. या व्यवसायावरच त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता. परंतू मागील वर्षी डिसेंबरमध्ये नगर पालिकेने सदर अतिक्रमण हटवून जवळपास १२८८ लघु व्यावसायिकांना बेरोजगार केले. ज्या जागी व्यवसाय सुरू होते, त्याठिकाणी आता नगर पालिकेने उकीर्डे तयार केले आहेत. ही चूक लक्षात येताच पालिकेने लघु व्यावसायिकांसाठी गाळे बांधने चालू केले आहे.

परंतु आज एक वर्षे पूर्ण होवूनसुद्धा एकाही लघु व्यावसायिकास गाळे देण्यास नगर पालिका जिल्हा प्रशासन असमर्थ ठरले आहे. अतिक्रमण उठल्यामुळे अनेक व्यावसायिक बेरोजगार झाले आहेत. परिणामी त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी दुसऱ्या शहरात जावे लागले आहे. तर ज्यांनी दुकाने भाड्याने घेतली आहेत, त्यांना भाडे देणे कठीण झाले आहे.

भांडवलदाराच्या बोटावर नाचणाऱ्या नगर पालिका प्रशासनाला याची जाणीव व्हावी अतिक्रमण हटविण्याला एक वर्षे पूर्ण झाल्याबद्दल व्यावसायिकांनी आज कँडल मार्च काढून पालिका प्रशासनाचा निषेध केला.

त्यानंतर लघु व्यावसायिकांनी ज्या जागेवर दुकान होते, त्या जागी कँडल लावून प्रशासनाचे वर्षे श्राद्धही केले. यावेळी राजू परमार, समाधान पालकर, दिलीप सराफ, संतोष हिंगणे, चेतन महाजन, भगवान एकडे, राजेंद्र अग्रवाल, संतोष जंजाळकर, अजय कऱ्हाळे, पऱ्हाडे, खिल्लारे, देशमुख बापू, बंडू सराफ उपस्थित होते. नगर पालिकेने लघू व्यावसायिकांची दुकाने हटवूनही परिस्थिती कायम असल्याने निषेध व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...