आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव कार पुलावरून कोसळली नदीमध्ये, पाताळगंगा नदीवर सुदैवाने टळली प्राण हानी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भरधाव कार पाताळगंगा नदीवरील पुलाच्या भिंतीत अशी अडकली होती. - Divya Marathi
भरधाव कार पाताळगंगा नदीवरील पुलाच्या भिंतीत अशी अडकली होती.
किनगावराजा - भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अनियंत्रित झालेली कार पुलावरून खाली कोसळून पुलाच्या दोन भिंतीमध्ये अडकली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही. परंतु वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही घटना जानेवारीच्या मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास पाताळगंगा नदीवर घडली. 
 
मेहकर तालुक्यातील परतापूर येथील ज्ञानदेव गाडेकर हे काल जानेवारी रोजी रात्री सोलापूरवरून परत गावाकडे येत होते. यावेळी ते स्वत वाहन चालवित होते. पाताळगंगा नदीच्या पुलावर येताच नियंत्रण सुटल्यामुळे पुलावर कठडे नसल्यामुळे त्यांची कार पुलाखाली कोसळून पुलाच्या दोन भिंतीमध्ये अडकली. त्यामुळे चालक मालक गाडेकर यांना कुठलीच दुखापत झाली नाही. परंतु या अपघातात त्यांच्या वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान आज सकाळी ही घटना उघडकीस येताच असंख्य ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून ग्रामस्थांच्या मदतीने सदर वाहनाला भिंतीत अडकलेल्या वाहनाला वर काढले. 

पाताळगंगा नदीच्या पुलावर कठडे नसल्यामुळे या पुलावर सतत अपघाताच्या घटना घडत आहेत. भविष्यातील अपघाताला आळा घालण्यासाठी बांधकाम विभागाने या पुलावर कठडे बसविण्यात यावे, अशी मागणी होत आहे. 

 
बातम्या आणखी आहेत...