आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलकापुरात दंगलीचा वणवा, मंगळवारी बाजार समितीमधील दाेन ट्रक दोन दुकाने जाळली, शहरात धरपकड सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलकापूर - हजरममहम्मद पैगंबर यांचे जयंती निमित्त विना परवाना काढण्यात आलेल्या मोटार सायकल मिरवणुकीदरम्यान नारेबाजीमुळे सोमवारी मलकापुरात दंगल उसळली. सालीपुरा भागातील पोलिस स्टेशनवर दगडफेक करून तोडफोड करण्यात आल्याच्या घटनेचे पडसाद आजही उमटले. मंगळवारीही शहरामध्ये जाळपोळीच्या घटना घडल्या. दरम्यान, ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तक्रारीनंतर ८२ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले असून, ८० जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर उर्वरित आरोपी फरार आहेत.
सोमवारच्या घटनेनंतर मलकापूर शहरात संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. संचारबंदी कायम असताना काही समाज कंटकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेले दोन ट्रक रात्रीचे दरम्यान जाळल्याने शहरातील वातावरण पुन्हा तणावाखाली आले. तर दोन दुकानांना आगी लावण्यात आल्या. सोमवारी घोषणाबाजी करत सालीपुरा, दुर्गानगर, बारादरी भागात दगडफेक केल्यानंतर ग्रामीण पोलिस स्टेशनवर पोलिसांवर दगडफेक करण्यात अाली होती. या प्रकरणी पोलिस निरीक्षक मधुकर भोगे यांनी शहर पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरुन ८२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूर येथे ट्रक जाळल्याने लाख रुपयाचे नुकसान झाले असून, दसरखेड पोलिस निरीक्षक संजय सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दुसऱ्या दिवशीही मलकापुरातील व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा, महाविद्यालय बंद होती.
रेल्वेस्थानक ते बस स्थानक मार्ग खुला : मुंबईनागपूर तसेच इतर राज्यातून मलकापूर रेल्वे मार्गावर आलेल्या प्रवाशांची चिंता प्रशासनाने मिटवली अाहे. मलकापूर रेल्वे स्थानकावर उतरणारे प्रवासी एकतर मलकापूरचे असतात. किंवा बुलडाणा, नांदुराकडील असतात. अशा प्रवाशांची चौकशी करून त्यांना रेल्वे स्थानक ते बसस्थानकापर्यंतचा मार्ग मोकळा आहे. तर शहरातील सर्व शाळा बंद आहेत.

दंगलीचे गुन्हे दाखल
दरम्यान या प्रकरणात दाखल करण्यात आलेले गुन्हे गंभीर स्वरुपाचे आहेत. तर सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम शस्त्र बाळगण्यासारख्या गुन्ह्यासह इतर प्रकारचे दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत ८० जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिस आयुक्त तळ ठोकून
मलकापुरात संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर प्रत्येक घडामोडीची पोलिस खबर ठेवत अाहेत. तसेच विभागीय पोलिस आयुक्त विठ्ठल जाधव, जिल्हाधिकारी डॉ.विजय झाडे, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बावीस्कर हे मलकापूर शहरात तळ ठोकून आहेत.

अफवांवर विश्वास ठेवू नका
-मलकापूर शहरातीलदंगल नियंत्रणात आली असून, पाेलिस प्रशासनाकडून आरोपींची धरपकड करण्यात आली आहे . मात्र, काही अनुचित घटना घडल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशा चर्चांना किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका.''
डॉ.विजयझाडे, जिल्हाधिकारी,
बातम्या आणखी आहेत...