आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकाेला: सीसी कॅमेरा खरेदी घाेटाळा पुन्हा पाेहाेचणार विधिमंडळात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅमेरे बंदच - Divya Marathi
कॅमेरे बंदच
अकाेला - सीसीटीव्ही कॅमेरा खरेदी घाेटाळा पुन्हा विधी मंडळात गाजणार असून, याबाबत अामदार रणधीर सावरकर यांनी लक्ष्यवेधी सूचना केली अाहे. त्यांनी चाैकशी कारवाईबाबत प्रश्न विचारले अाहेत. यापूर्वीही त्यांची लक्ष्यवेधी सूचना केल्याने चौकशीला प्रारंभ झाला हाेता. चाैकशी पूर्ण हाेण्यापूर्वीच संबंधित पुरवठा-दाराने संपूर्ण रक्कमचे धनादेश संबंधित पंचायत समित्यांना सादर केले हाेते. 
 
जिल्ह्यातील पंचायत समितींपैकी पंचायत समित्यांमधील कॅमेरे बंदच आहेत. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष्ज्ञ देण्याची गरज आहे. जिल्हा नियोजन समितीअंतर्गत नावीन्यपूर्ण याेजनेतून सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करण्यात अाले. खरेदी प्रक्रिया जिल्हा परिषदने राबवली. हे सीसीटीव्ही कॅमेरे , पंचायत समितीमध्ये बसवण्यात अाले. यासाठी २९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात अाला. जिल्हा परिषद प्रशासनाने फेब्रुवारी २०१६ राेजी सर्व प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता दिली. पंचायत समित्यांनीही तत्परता दाखवित त्याच दिवशी जिल्ह्यात सर्वत्र साहित्य खरेदीचे सर्व सोपस्कार दरपत्रकाच्या खरेदीच्या निविदा बाेलावल्या. पंचायत समिती प्रशासनाला ठराविक पुरवठादारांकडूनच खरेदी करावी, अशा सूचना वरिष्ठांकडून देण्यात अाल्या हाेेत्या. त्यानुसार खरेदी प्रक्रिया पार पाडण्यात अाली हाेती. मात्र खरेदी प्रक्रियेची तक्रार झाल्याने अमरावती विभागीय अायुक्त कार्यालयातील उपायुक्तांकडून चाैकशी करण्याचा अादेश ग्रामविकास मंत्र्यांनी दिला हाेता. 
 
घाेळदडपण्यासाठी अाटापिटा ? : तीन लाख रुपयांच्या खरेदीसाठी ई-टेंडरिंग प्रक्रिया राबवावी लागते. मर्जीतील पुरवठादाराला पुरवठा अादेश देण्यासाठी ई-टेंडरिंग प्रक्रिया टाळण्यासाठी सीसी-कॅमेरा या युनीटचे दाेन भागात विभाजन करण्यात अाले. अादेशक्रमांक १८१नुसार सीसीकॅमेरा केबलसाठी (प्रती युनीट) लाख ९० हजार अािण अादेशक्रमांक १८२नुसार युपीस, डिस्क स्क्रिनसाठी लाख २४ हजार रुपयाचे देयक अदा करण्यात अाले. विना स्क्रिन डिस्कचे सीसीकॅमेऱ्यांचा काय फायदा, स्क्रिन नसल्यास दिसणार काय अािण डिस्क नसल्यास क्लिप्स (हालचाली), अावाज इतर बाबी साठवणार कुठे (सेव्ह) असे प्रश्न अधिकाऱ्यांना का नाही पडले कि ई-टेंडरिंग टाळण्यासाठी त्यांनी याकडे दुर्लक्ष केले, असा सवाल अाता उपस्थित करण्यात येत अाहे. 
१) सीसीकॅमेरा खरेदी प्रक्रिया कशी राबवण्यात अाली ? 
२) किती निविदा काढण्यात अाल्या, एका पेक्षा जास्त निविदा काढल्या असल्यास त्याचे कारण काय? 
३) सीसीकॅमेरे खरेदी विभाजन करुन का करण्यात अाली ? 
 
केवळसाडेतीन ते साडेचार हजाराचा फरक : सीसीटीव्ही कॅमेरे प्रणाली बसवण्यासाठी डिस्क, स्क्रिन युपीएस प्रणाली खरेदीसाठी निविदा मागवण्यात अाल्या. केवळ तीनच पुरवठारांनी दरपत्रक सादर केले. यामध्ये सुरभी इलेक्ट्राे सिस्टीम (१ लाख २४ हजार ५००) लॅपटाॅप क्लिनिक नेटवर्क( लाख २० हजार) डिजी शाॅप ( लाख २३ हजार ८००)चा समावेश हाेता. सर्वात कमी लॅपटाॅप क्लिनिक नेटवर्कचा दर असल्याने त्यांना पुरवठा अादेश देण्यात अाला. या तिन्ही पुरवठादारांमध्ये हजार ८०० ते हजार ५०० रुपयांचा फरक हाेता. एकूणच तीनच िनविदा कशा अाल्या, एवढा कमी फरक कसा हाेता, असे एक ना अनेक प्रश्न अाता उपस्थित करण्यात येत असून, उच्चस्तरीय चाैकशी समितीने या प्रश्नांची उत्तरे शाेधण्याची मागणी हाेत अाहे. 
 
बीडीअाेंची झाली चाैकशी 
सीसीटीव्ही कॅमेरा खरेदी घाेटाळयाप्रकरणी अमरावती विभागीय अायुक्त कार्यालयातील उपायुक्तांच्या पथकाडून गत अाठवड्यात गट विकास अधिकाऱ्यांची चाैकशी (बीडीअाे) केली हाेती. या पथकाने पुढीलप्रमाणे ३२ प्रश्नांची उत्तरेच जाणून घेतली हाेती. पथकाने सर्वाधिक चाैकशी बीडीअाेंची केल्याने त्यांनी धसका घेतला अाहे. 

कॅमेरे बंदच 
सीसीकॅमेरे खरेदीप्रकरणी तक्रार झाल्यानंतर विभागीय अायुक्तांनी जिल्हा नियाेजन समितीला मािहती सादर करण्यास सांगितली. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीच्या पथकाने निरक्षण केले. जिल्ह्यातील पंचायत समित्यांपैकी पंचायत समित्या मध्ये लावलेले सी.सी.टीव्ही कॅमेरे बंद स्थितीत असल्याचे पुढे अाले. पुरवठादारांने कॅमेरे हाताळण्याबाबत यंत्रणेला प्रशिक्षण दिले नाही. 

ही हवी माहिती 
सीसी कॅमेरा घाेटाळ्याप्रकरणी विधी मंडळ प्रशासनाकडून जि.प.ला मािहती सादर करण्याचा अादेश प्राप्त झाला अाहे. त्यानुसार पुढील प्रश्नांची उत्तरे माहितीस्वरुपात सादर करावी लागणार अाहे. 

१) घाेटाळ्याप्रकरणी विभागीय कार्यालयातील अायुक्त कार्यालयातील उपायुक्तांकडून चाैकशी करण्यात अाली काय? 
२) चाैकशी झाली असल्यास उपायुक्तांना शासनाने चाैकशीसाठी बाेलावले हाेते काय? 
३) चाैकशीमध्ये काेणते अधिकारी दाेषी अाढळून अाले? त्यांच्यावर काेणती कारवाई झाली? 
४) कारवाई झाली नसल्यास विलंबाची कारणे काेणती ? 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...