आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या नाेटा बदलण्यासाठी खटाटोप; खासगी व्यक्तींकडून घेतले धनादेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला -  महाविद्यालयात व्याख्यातांच्या नियुक्तीपाेटी जुन्या नाेटांच्या माध्यमातून मिळालेले पैसे नवीन नाेटांमध्ये बदलून घेण्यासाठी खासगी व्यक्तींकडून धनादेश स्वीकारल्याचा प्रकार दि बेरार जनरल एज्युकेशन (बेरार) साेसायटीमध्ये घडल्याचा दावा तत्कालीन वरिष्ठ उपाध्यक्ष, अाजीवन सदस्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केला अाहे. हा दावा त्यांनी साेसायटीच्या कार्यालयामध्ये कागदपत्रांच्या पाहणीनंतर तयार केलेल्या पंचनामा, दस्तऐवजात केला अाहे. या दस्तऐवजामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून, त्रयस्थ यंत्रणेकडून सखाेल चाैकशीअंतीच नेमका प्रकार उजेडात येणार अाहे. 
 
दि बेरार जनरल एज्युकेशन (बेरार) साेसायटी संचालित विज्ञान, कला, वाणिज्य, विधी महाविद्यालय अाहे. फेब्रुवारी २००७ राेजी साेसायटीचे तत्कालीन वरिष्ठ उपाध्यक्ष के. बी. लाेहिया, अाजीवन सदस्य रामअवतार अग्रवाल हे कार्यालयात गेले. या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी संजीव घड्याळजी हेही उपस्थित हाेते. या तिघांनी कागदपत्रांची पाहणी केली. 
या पाहणीनंतर तिघांनी माहिती संकलित करून दस्तऐवज (पंचनामा, अहवाल) तयार केला. नाेटाबंदी जाहीर हाेण्यापूर्वी अर्थात नाेव्हेंबर २०१६ पूर्वी व्याख्यातांची नियुक्ती प्रक्रिया राबवली. नियुक्तीसाठी प्रत्येकाकडून २५ लाख रुपये घेतल्याचे दस्तऐवजात नमूद केले अाहे. हे रुपये ५०० १००० रुपयांच्या जुन्या नाेटांमध्ये घेतले. जवळपास ८७ लाख २५ हजार रुपयांच्या जुन्या नाेटा खासगी व्यक्तींना दिल्या. या माेबदल्यात त्यांच्याकडून धनादेश घेतले, असे या दस्तऐवजात नमूद केले अाहे. या दस्तऐवजामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून, त्रयस्थ यंत्रणेकडून सखाेल चाैकशीअंतीच नेमका प्रकार उजेडात येणार अाहे. 
 
काय म्हणाले बीजीई साेसायटीचे पदाधिकारी? 
तत्कालीन वरिष्ठ उपाध्यक्ष, अाजीवन सदस्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नाेटा बदलीबाबत तयार केलेल्या दस्तऐवजाबाबत “दिव्य मराठीच्या प्रतिनिधीने प्रथम बीजीईचे अध्यक्ष डाॅ. अार. बी. हेडा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रशासकीय अधिकारी संजीवजी घड्याळजी यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले. घड्याळजी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भाष्य करण्यास नकार देत सचिवांशी चर्चा करा, असे सांगितले. त्यामुळे डाॅ. माेतीसिंह माेहता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे सर्व विराेधकांचे षड््यंत्र असून, असा काेणताच प्रकार घडला नाही, असा दावा केला. संबंधितांनी साेसायटीला देणगीपाेटी धनादेश दिले असतील. याबाबत सखाेल चाैकशी करण्यात येईल अध्यक्षांशीही चर्चा करू, असेही अॅड. माेहता म्हणाले. 
 
जुन्यानाेटा देऊन धनादेश घेतले : जुन्यानाेटा दिल्यानंतर संबंधितांकडून १४.५९ टक्के वजा करून धनादेश घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. दस्तऐवजानुसार (अहवाल) १६ व्यक्तींना एकूण ८७ लाख २५ हजार रुपये दिले. त्यांच्याकडून ७४ लाख ७७ हजार रुपयांचे धनादेश घेतले. १८ लाख २५ हजार रुपयांच्या नाेटा दिलेल्या संबंधित व्यक्तीकडून १५ लाख रुपयांचे धनादेश घेतले, असे अहवालात नमूद अाहे. अशाच पद्धतीने इतर १५ व्यक्तींना जुन्या नाेटा देऊन धनादेश घेतले. 
कर्मचाऱ्यांनाहीिदल्या जुन्या नाेटा : शाळा,महाविद्यालय कर्मचाऱ्यांनाही जुन्या नाेटा दिल्याचे अहवालात नमूद अाहे. पहिल्या टप्प्यात १५ लाख ९५६ दुसऱ्या टप्प्यात लाख ९१ हजार ७०० रुपये दिले. मात्र, हे कुठेही हिशेबात का अाले नाही, हे देवालाच माहीत, असेही अहवालात म्हटले अाहे. ़

अनेकबाबी अस्पष्ट : जुन्या नाेटा दिल्यानंतर (राेख रक्कम, धनादेश) ७४ लाख ५२० रुपये येणे अावश्यक हाेते. मात्र, ४२ लाख १०५ रुपये मिळाले असून, उर्वरित ३२ लाख ७६ हजार ८९५ रुपयांच्या धनादेशाबाबत पदाधिकाऱ्यांना माहित असावे किंवा संबंधितांकडून धनादेश प्राप्त झाले नसावेत, असे त्या दस्तऐवजात नमूद केले अाहे. 

काय म्हणाले बीजीई साेसायटीचे पदाधिकारी? 
तत्कालीनवरिष्ठ उपाध्यक्ष, अाजीवन सदस्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नाेटा बदलीबाबत तयार केलेल्या दस्तऐवजाबाबत “दिव्य मराठीच्या प्रतिनिधीने प्रथम बीजीईचे अध्यक्ष डाॅ. अार. बी. हेडा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रशासकीय अधिकारी संजीवजी घड्याळजी यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले. घड्याळजी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भाष्य करण्यास नकार देत सचिवांशी चर्चा करा, असे सांगितले. त्यामुळे डाॅ. माेतीसिंह माेहता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे सर्व विराेधकांचे षड््यंत्र असून, असा काेणताच प्रकार घडला नाही, असा दावा केला. संबंधितांनी साेसायटीला देणगीपाेटी धनादेश दिले असतील. याबाबत सखाेल चाैकशी करण्यात येईल अध्यक्षांशीही चर्चा करू, असेही अॅड. माेहता म्हणाले. 

काय म्हणतात अाजीवन सदस्य ? 
साेसायटीचे तत्कालीन वरिष्ठ उपाध्यक्ष के. बी. लाेहिया अाजीवन सदस्य रामअवतार अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी साेसायटी कार्यालयात जाऊन पंचनामा केल्याचे सांगितले. दस्तऐवजांची तपासणीनंतर जुन्या नाेटा बदलल्याचे समाेर अाले. तपासणीच्या वेळी प्रशासकीय अधिकारी संजीव घड्याळजी हाेते. ही माहिती घड्याळजींकडून घेतली, असेही अग्रवाल यांनी सांगितले. 
 
बातम्या आणखी आहेत...