आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस अन् राष्ट्रवादी म्हणजे दिवाळे निघालेल्या बँका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्री फडणवीस यांचे कृषीमंत्री फुंडकर यांनी स्वागत केले. - Divya Marathi
मुख्यमंत्री फडणवीस यांचे कृषीमंत्री फुंडकर यांनी स्वागत केले.
अकोला - आपले मत म्हणजे पाच वर्षासाठीची गुंतवणुक आहे. ही गुंतवणुक करताना आपल्याला भान ठेवावे लागेल. कारण तूर्तास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे बुडीत बॅका असुन त्यांचे दिवाळे निघाले आहे, असा आरोप करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मतांची गुंतवणुक भारतीय जनता पक्षात करा, तुम्हाला विकासरुपी व्याज परत मिळेल, असा दावाही केला. 
 
१७ फेब्रुवारीला भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अकोला क्रिकेट क्लब मैदानावर झालेल्या जाहिर सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदानाचे महत्व विषद केले. मतदान म्हणजे केवळ मत देणे नव्हे. ही पाच वर्षाची गुंतवणुक आहे. तुमच्या आशा, आकांक्षा, अपेक्षांची पूर्तात करण्यासाठी हे मतदान आहे. ज्या प्रमाणे आपण फिक्स रक्कम बँकेत ठेवताना अधिक व्याज दर कोणत्या बँकेचा आहे, याची शहानिशा करतो त्या नंतर रक्कम फिक्स करतो. त्याच प्रमाणे आपल्या मताची गुंतवणुक करताना कोणत्या पक्षाची बॅक विकासरुपी परतावा देईल, ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे. कारण शरदचंद्र पवार आणि राहुल गांधी यांच्या बँकेचे दिवाळे निघाले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षात गुंतवणुक करु नका. गुंतवणुक केल्यास विकासरुपी परतावा तर सोडा मुद्दलही परत मिळणार नाही. त्यामुळे मताच डिपॉझिट फक्त भाजप बॅकेत करा, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले. आपल्या २० मिनिटाच्या भाषणात विकासाचे अनेक मुद्दे मांडले. विदर्भातील गावांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्या गेले. पश्चिम महाराष्ट्रातील गावांना निधी मिळाला. मात्र विदर्भातील गावांना मिळाला नाही. परंतु मी तुमच्याच भूमितील पुत्र आहे. त्यामुळे ज्या भागावर अन्याय झाला, त्या भागाचा अन्याय दुर करण्याचा मी प्रयत्न करतोय. याचा अर्थ हा नव्हे की विदर्भ वगळता इतर भागाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे इतरांच्या पोटात दुखण्याचे काहीही कारण नाही, असे स्पष्ट करतानाच जो पर्यत शहराचे लिव्हिंग स्टॅडर्ड वाढत नाही, शहरात सोयी सुविधा उपलब्ध होत नाहीत, तो पर्यंत कोणत्याही गावात उद्योगधंदे येणार नाही. या सर्व व्यवस्था झाल्यास शहरात उद्योग धंदेही येतील, आमचा तसा प्रयत्न सुरु असल्याचेही ते म्हणाले. 
 
खासदार संजय धोत्रे यांनी आपल्या प्रास्ताविकात अकोल्याचा मागील २०-२५ वर्षात विकास झाला नसल्याचे सांगत अकोल्यावर युती शासन वगळता अन्याय झाला आहे. मात्र आता हा अन्याय दुर होत असून शहरात झालेली विकास कामे तसेच जिल्ह्यातील मार्गी लागलेली विविध कामे त्यांनी सभेत मांडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाजपचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी केले. डॉ.किशोर मालोकार यांनी आभार मानले. व्यासपिठावर कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधिर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, महापौर उज्वला देशमुख तसेच अकोट, मूर्तिजापूर आणि तेल्हारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. 
 
माजीपालकमंत्र्यांच्या विकासाच्या केवल वल्गना: आपल्याछोटेखानी भाषणात पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी अकोल्याच्या माजी पालकमंत्र्यांवर घणाघाती आरोप केले. माजी पालकमंत्र्यांनी विकासाच्या केवळ वल्गना केल्या. मात्र कारभार औरंगाबाद येथून हाकला. माजी पालकमंत्र्यांनी जेवढे दौरे अकोल्याचे केले नसतील, त्यापेक्षा जास्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौरे केले, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाणता राजा असा उल्लेख केला आहे.त्यामुळे या दोन्ही पक्षात गुंतवणुक करु नका. गुंतवणुक केल्यास विकासरुपी परतावा तर सोडा मुद्दलही परत मिळणार नाही. त्यामुळे मताच डिपॉझिट फक्त भाजप बॅकेत करा, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले. आपल्या २० मिनिटाच्या भाषणात विकासाचे अनेक मुद्दे मांडले. 
 
विदर्भातील गावांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्या गेले. पश्चिम महाराष्ट्रातील गावांना निधी मिळाला. मात्र विदर्भातील गावांना मिळाला नाही. परंतु मी तुमच्याच भूमितील पुत्र आहे. त्यामुळे ज्या भागावर अन्याय झाला, त्या भागाचा अन्याय दुर करण्याचा मी प्रयत्न करतोय. याचा अर्थ हा नव्हे की विदर्भ वगळता इतर भागाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे इतरांच्या पोटात दुखण्याचे काहीही कारण नाही, असे स्पष्ट करतानाच जो पर्यत शहराचे लिव्हिंग स्टॅडर्ड वाढत नाही, शहरात सोयी सुविधा उपलब्ध होत नाहीत, तो पर्यंत कोणत्याही गावात उद्योगधंदे येणार नाही. या सर्व व्यवस्था झाल्यास शहरात उद्योग धंदेही येतील, आमचा तसा प्रयत्न सुरु असल्याचेही ते म्हणाले. 
 
खासदार संजय धोत्रे यांनी आपल्या प्रास्ताविकात अकोल्याचा मागील २०-२५ वर्षात विकास झाला नसल्याचे सांगत अकोल्यावर युती शासन वगळता अन्याय झाला आहे. मात्र आता हा अन्याय दुर होत असून शहरात झालेली विकास कामे तसेच जिल्ह्यातील मार्गी लागलेली विविध कामे त्यांनी सभेत मांडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाजपचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी केले. डॉ.किशोर मालोकार यांनी आभार मानले. व्यासपिठावर कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधिर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, महापौर उज्वला देशमुख तसेच अकोट, मूर्तिजापूर आणि तेल्हारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. 

माजी पालकमंत्र्यांच्या विकासाच्या केवल वल्गना 
आपल्या छोटेखानी भाषणात पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी अकोल्याच्या माजी पालकमंत्र्यांवर घणाघाती आरोप केले. माजी पालकमंत्र्यांनी विकासाच्या केवळ वल्गना केल्या. मात्र कारभार औरंगाबाद येथून हाकला. माजी पालकमंत्र्यांनी जेवढे दौरे अकोल्याचे केले नसतील, त्यापेक्षा जास्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौरे केले, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाणता राजा असा उल्लेख केला. 
 
शिर्डीहुन स्पेशल हार 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी शिर्डी येथुन स्पेशल गुलाबाचा भला मोठा हार आणला होता. हा हार घालुन मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, किशोर मांगटे पाटील यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पूर्वी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात आयोजित केली होती. परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीने ही सभा अकोला क्रिकेट क्लब मैदानावर घेण्यात आली. महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची सभा एसीसी मैदानावर यापूर्वी २००७ ला राज ठाकरे यांची सभा झाली होती. त्यामुळे सभेला गर्दी होणार की नाही? अशी चर्चा गुरुवार पासून सर्वत्र सुरु होती. मात्र सभा यशस्वी झाली. मैदान मोठे असल्याने मैदानावर डोम उभारण्यात आला होता. डोम मध्ये जवळपास दहा हजार खुर्च्याची व्यवस्था करण्यात अाली होती. यापैकी तुरळक खुर्चा रिकाम्या होत्या. त्यामुळे सभा यशस्वी झाली. विशेष म्हणजे विरोधकांचेही यासभेकडे लक्ष लागले होते. त्यामुळेच सभा संपल्या नंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी सभेची माहिती घेतली. 
बातम्या आणखी आहेत...