आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्ह्यामध्ये बालमृत्यूच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ, २००७मध्ये जिल्ह्यात ६३ बालकांचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाशीम- बालमृत्यूंचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आरोग्य विभागातर्फे विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी वाशीम जिल्ह्यात मात्र बालमृत्यूंच्या प्रमाणात घट होण्याऐवजी वाढच होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. सन २००७-०८ मधील ६३ बालमृत्यूचा आकडा सन २०१५-१६ मध्ये ९१ वर पोचला आहे.

वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाच्या दप्तरी असलेल्या बालमृत्यूच्या आकडेवारीचा लेखाजोखा घेतला असता, बालमृत्यू दरात कुठलीच सुधारणा होत नसल्याचे दिसून येते. २००७-०८ ते २०१५-१६ या कालावधीतील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बालमृत्यू दराच्या आकडेवारीतून अनेक धक्कादायक पैलू बाहेर येत आहेत. सन २००७-०८ मध्ये ६२ बालमृत्यू होते. यामध्ये सन २००८-०९ मध्ये कमालीची वाढ होऊन हा आकडा १०३ वर पोचला होता. बालमृत्यूचे प्रमाण वाढल्याचे पाहून आरोग्य यंत्रणा हादरून गेली.

सरकारी दवाखान्यांमध्ये महिला प्रसूतीचे प्रमाण वाढवण्यासाठी आरोग्य विभागाने मोहीम हाती घेतली. यामुळे पुढच्याच वर्षी सन २००९-१० मध्ये बालमृत्यूचा आकडा ५९ पर्यंत खाली आला. त्यानंतर सन २०१०-११ मध्ये बालमृत्यूचा आकडा ५३ असा राहिला. मात्र, त्यानंतर पुन्हा आरोग्य विभागाची मोहीम थंडावली आणि बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली. सन २०११-१२ मध्ये ८० बालकांचे मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा आरोग्य विभागात खळबळ उडाली. वरिष्ठ स्तरावरून कानउघाडणी झाल्याने बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती अन्य उपाययोजनांवर भर देण्यात आला. आरोग्य विभागाने या वर्षात केलेल्या चमकदार कामगिरीमुळे सन २०१२-१३ मध्ये बालमृत्यूचा आकडा ३६ पर्यंत खाली आला. त्यानंतरही आरोग्य विभागाने व्यापक जनजागृती उपाय योजनांवरील कामगिरीत सातत्य राखल्याने सन २०१३-१४ मध्ये बालमृत्यूचे प्रमाण २७ पर्यंत खाली आले. यानंतर मात्र आरोग्य विभागाच्या व्यापक जनजागृतीत शिथिलता आली आणि पुन्हा बालमृत्यूच्या आकड्याने झेप घेतली. सन २०१४-१५ मध्ये जिल्ह्यात ५५ बालमृत्यू झाले. बालमृत्यूच्या वाढत्या प्रमाणाच्या पृष्ठभूमीवर २०१५ मध्येही फारसे गांभीर्य दाखविल्याने सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यात ९१ बालमृत्यू झाले.

ग्रामीण रुग्णालयात पुरेशा प्रमाणात सुविधा उपलब्ध नसल्याचे कारण समोर करून गर्भवती महिलांना ‘रेफर टू सिव्हिल हॉस्पिटल’चा सल्ला दिला जातो. २००७ ते २०१५ या कालावधीतही बालमृत्यूचा दर कमी झाला नसल्याने नवनवीन संशोधन, अत्याधुनिक सोयीसुविधा आणि कोट्यवधी रुपयांची तरतूद असलेल्या योजना वाशिम जिल्ह्यातून गेल्या कुठे? असा सवाल उपस्थित होत आहे.

बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतींचे प्रमाण कसे वाढेल, या दृष्टिकोनातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. बालमृत्यू दर कमी करण्याच्या नावाखाली केंद्र राज्य शासन आरोग्य विभागावर पैशाचा पाऊस पाडत आहे. उपक्रम योजना वाशिम जिल्ह्यातही सुरू आहेत. तथापि, बालमृत्यू दरकमी करण्यात यश आले नाही.

अतिदक्षता विभाग २४ तास सज्ज
बालमृत्यूचे प्रमाणकमी करण्यासाठी गर्भवती मातांची नियमित तपासणी, लसीकरण केले जाईल. अतिदक्षता विभाग २४ तास सज्ज ठेवण्यात येईल. घरी बाळंतपण करता शासकीय रुग्णालयात गर्भवती महिलांची प्रसूती करण्यावर भर दिला जाईल. दुर्गम भागात घरीच प्रसूती होत असल्याने याकरिता ग्रामीण भागातील गरोदर मातांंनी वेळोवेळी तपासणी करून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. डॉ.शेख नसरूद्दीन पटेल जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

समस्या कायमच
केंद्र राज्य शासन बालमृत्यू दराबाबत गंभीर असल्याने मृत्यू दराचा आकडा कमी करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद असलेल्या योजना अंमलात आणत आहे. मात्र, वाशीम जिल्ह्यातील बालमृत्यू दराच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास बालमृत्यू दरात घट होण्याऐवजी वाढ झाली असल्याचे दिसून येते.

बातम्या आणखी आहेत...