आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असणार शहर बस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - प्रशासनाच्या दिरंगाई मुळे बस सेवा सुरु होण्यास विलंब होत आहे. मात्र येत्या काही दिवसात सुरु होणाऱ्या शहर बस सेवेत अकोलेकरांना अत्याधुनिक सोयी सुविधा मिळणार आहेत. प्रत्येक बस सोबत वायफार सेवा, सिसीटिव्ही कॅमेरे, जीपीएस, जीपीआरस आदी सुविधांचा यात समावेश आहे.
महापालिका अस्तित्वात आल्या नंतर महापालिका क्षेत्रात सहकारी तत्वावर राज्यात शहर बस वाहतुक सेवा सुरु करण्यात आली. याच धर्तीवर अन्य महापालिकांमध्येही ही सेवा सुरु करण्यात आली. मात्र राज्यात नावलौकिक मिळवणारी ही बससेवा मात्र अकोल्यात कोलमडली. या मागे विविध कारणांचा समावेश आहे. मात्र गेल्या तीन ते चार वर्षापासून शहर बस वाहतुक सेवेपासून नागरिक वंचित आहेत.
ही शहर बस वाहतुक सेवा पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न झाला. परंतु बस सेवा सुरु करण्याच्या अनुषंगाने प्रसिद्ध केलेल्या निविदांमध्ये बँॅकेकडून कर्जाने बस घेताना महापालिका गॅरंटर राहिल, अशी हमी देण्यात आली होती. आयुक्त अजय लहाने ही निविदा रद्द करुन नव्याने निविदा प्रसिद्ध केल्या. या निविदांमध्ये बस खरेदी करताना महापालिका कोणत्याही प्रकारे गॅरंटर म्हणुन राहणार नाही, अशी अट घातली. त्याच प्रमाणे प्रति किलोमिटर नुसार महापालिकेला रॉयल्टी देण्याची अट घातली. यानुसार महापालिकेला प्रतिकिलोमिटर दोन रुपये ११ पैसे या नुसार रॉयल्टी देणाऱ्या कंपनीला शहर बस वाहतुकीचे कंत्राट देण्यात आले. विशेष म्हणजे महापालिकेची होणारी हद्दवाढ लक्षात घेऊन बस सेवेचा रुट निश्चित करण्यात आला.
पहिल्या टप्प्यात १५ ते २० बस नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहेत. बस पूर्णपणे तयार झाली असून केवळ प्रशासनाला वेळ नसल्याने या बसची पाहणी रखडली आहे. ३२ आसनी असलेल्या या बस मध्ये महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आदींसाठी जागा आरक्षित राहणार असून विद्यार्थ्यासह सर्वानाच पासेस दिल्या जाणार आहेत. या पासेस नियमानुसार दिल्या जातील. परिणामी दररोज जाणे-येणे करणाऱ्या व्यक्तीला पास घेतल्यास कमी खर्चात प्रवास करता येणार आहे.

तीनमार्गावर धावणार बसेस
पहिल्याटप्प्यात डाबकी ते उमरी, खडकी ते रेल्वे स्थानक आणि संत तुकाराम चौक ते रेल्वे स्थानक या मार्गावर ही बससेवा सुरु होऊ शकते. टप्प्या-टप्प्याने बस उपलब्ध झाल्या नंतर उर्वरित सर्वच मार्गावर नागरिकांना ही सेवा मिळणार असून ३२ आसनीपेक्षाही अधिक आसनी बसही शहरात मोठ्या रस्त्यांवर धावणार आहेत.

तंत्रज्ञानाचा वापर : प्रत्येकबस मध्ये जीपीआरएस पद्धतीची तिकीट मशिन राहणार आहे. बस मध्ये चढलेल्या प्रत्येक प्रवाशाला वाहकाने तिकिट दिले की नाही ? याची माहिती कंट्रोल रुम मध्ये बसल्या बसल्या पाहावयास मिळणार आहे. त्यामुळे चेकरची फारशी आवश्यकता भासणार नाही.
बातम्या आणखी आहेत...