अकोला- स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत ६७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद प्रशासनातर्फे महास्वच्छता अभियान राबवले जात आहे. सरपंचाच्या नेतृत्वात शौचालय नसणाऱ्या कुटुंबप्रमुखांंना शौचालय बांधण्याबाबत आग्रह धरून गांधीगिरी पद्धतीने साकडे घातले जाणार आहे.
गणराज्य दिनाच्या अाधीच्या दिवशी २५ जानेवारीला सर्व जिल्हाभरात प्रत्येक शहरात खेड्यापाड्यातून महास्वच्छता अभियान राबवण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय मिळून घेण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, खासगी संस्था कार्यालयांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व कार्यालय प्रमुखांनी आपल्या परिसरातील संपूर्ण साफसफाई करावी आहे. प्रत्येक गावातील शाळा, ग्रामपंचायत कार्यालये, कोंडवाडे, दवाखाने, पशुवैद्यकीय दवाखाने, धर्माळे इतर संस्थांची कार्यालये साफ करून चकचकित करावयाची आहेत. याशिवाय २६ जानेवारीला रंगीत पताका, रांगोळ्यांनी परिसर सुशोभित करावा. झेंडावंदन प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे. सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, आरोग्य अधिकारी पशुधन पर्यवेक्षक, पशुधन विकास अधिकारी तलाठी, संपर्क अधिकारी हे सामूहिकपणे शौचालय नसणाऱ्यांच्या घरी जाऊन संबंधित कुटुंबप्रमुखांचे फूल देऊन स्वागत करतील. त्यांना शौचालय बांधण्यासाठी अाग्रह धरतील. हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले आहे.
आवाहनपत्रांचे वितरण : गावहागणदारी मुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी स्वाक्षरीचे आवाहन पत्र प्रत्येक सरपंच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांना दिले. जोपर्यंत गावातील व्यक्तींचे वैयक्तिक आरोग्य सार्वजनिक आरोग्य सुरक्षित करण्यासाठी यथोचित प्रयत्न करणार नाही, गावातील सर्व कुटुंबाकडून स्वच्छतेच्या आरोग्यदायी सहा सवयी गिरवून घेऊन त्याप्रमाणे आरोग्यदायी जीवन जगण्याचा सन्मान लोकांना उपलब्ध करून देणार नाही, तोपर्यंत ग्रामपंचायतींकडून ग्रामस्थांकडून कोणत्याही प्रकारचा सन्मान सत्कार स्वीकारणार नाही, असा संकल्प प्रत्येक सदस्याने करावा, असे आवाहन करण्यात आलेे आहे.