आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंदखेडराजा ऑक्टोबरपर्यंत हगणदरीमुक्त करणार, सर्व ग्राम सेवकांनी केला निर्धार; डब्यांची होळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंदखेडराजा - तालुक्यातील गावागावात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात येऊन जागृती करण्यात आली. या सोबतच ऑक्टोबर २०१७ पर्यंत संपूर्ण तालुका हागणदारीमुक्त करण्याचा निर्धारही ग्राम सेवकांनी व्यक्त केला. या वेळी गावातील उघड्यावरील शौचासाठी वापरले जाणारे सर्व डब्बे एकत्र करून त्यांची होळी केली. 
 
या संदर्भात सूत्रांंकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार तालुक्यातील वरुडी, गुंज, सावंगी भगत, राताळी, मोहाडी, उमनगाव, गोरेगाव, पांग्री काटे, लिंगा, आंबेवाडी, हनवतखेड, वाघाळा, हिवरा गडलिंग, दरेगाव, पोफळ शिवणी, डोरव्ही आदी गावात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मार्च रोजी विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक तसेच आशासेविका आदींनी एकत्र येत रॅली काढली. यातून ग्रामस्थांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन शौचालय बांधकामाबद्दल जागृती केली. तसेच गावातील उघड्यावरील शौचासाठी वापरले जाणारे सर्व डब्बे एकत्र करून त्यांची होळी करण्यात आली. तसेच आंबेवाडी येथे पं. स. सदस्या अश्विनी बोडखे यांच्या हस्ते शौचालय बांधकाम शुभारंभ करण्यात आले. त्यानंतर सर्व ग्रामसेवकांनी एका बैठकीत गुड मॉर्निंग पथक स्थापन करून ग्रामस्थांना उघड्यावर शौचास जाण्यास प्रतिबंध करण्याचा निर्धार केला आहे. 
या वेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जी. एम. पोफळे, आर. एस. पवार यांच्यासह उद्धव गायकवाड, एल. एम. पऱ्हाड, विनायक राठोड, अमित जाधव, आर. आय. पंढरे, आर. एम. मानतकर, पी. आर. लंबे, पी. ए. दानवे, वर्षा गवई, पडघान, जगताप, गावडे, मोरे, काजल राठोड, डी. एस. काळे, गजानन शिंगणे, गोपाल पवार, गारोळे, शेळके, विष्णू गीते उपस्थित होते. ग्रामसेवकांचा हा निर्धार कितपत यशस्वी होतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले. 

तालुका हागणदारीमुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून ठोस पावले उचलत त्या अनुषंगाने ग्राम सेवकांनी बैठकीत गुड मॉर्निंग पथक स्थापन केले. ग्रामस्थांना उघड्यावर शौचाला प्रतिबंध करण्यासह ऑक्टोबरपर्यंत तालुका हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. 
उघड्यावर शौचाससाठी वापर होणाऱ्या डब्ब्यांची होळी करताना ग्रामसेवक. 
बातम्या आणखी आहेत...