आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अन् सीएमचे हेलीकॉप्टर भरकटले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट - सध्या राज्यात नगरपालिका निवडणूक प्रचार अगदी शिगेला पोहोचला. एकमेकांच्या खुर्च्या हिसकावण्यासाठी नेत्यांची ही स्पर्धा अगदी टिपेला पोहोचलीय. यात सत्ताधारी भाजप काँग्रेसमध्ये हा संघर्ष तर मोठाच आहे. मात्र, अकोटमध्ये प्रचारासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलीकाॅप्टर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या हेलीकॉप्टरसाठी तयार केलेल्या हेलीपॅडवर उतरले. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. या किस्स्याने अनेकांचे मनोरंजन झाले.
आज अकोट येथे नगरपालिका निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशोक चव्हाण यांच्या सभा होत्या. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या सभेच्या आधी एक गमतीशीर किस्सा घडला. अकोट येथे दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री वाजता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे हेलीकॉप्टरने येणार होते. या दोघांसाठी दोन स्वतंत्र हेलीपॅड तयार केले होते. मुख्यमंत्र्यांचं हेलीपॅड होते जिनिंग प्रेसिंगच्या मैदानात, तर अशोक चव्हाण यांचं हेलिपॅड होतं तालुका रुग्णालया मागच्या शेतात. दोन्ही हेलीपॅडमध्ये अंतर होतं फक्त ५०० मीटरचं. मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टरनं घिरट्या घातल्या अन् ते थेट उतरलं अशोक चव्हाणांच्या हेलीकॉप्टरसाठी तयार केलेल्या हेलीपॅडवर... मात्र, मुख्यमंत्र्यांनाही येथे कोणतीच चहल-पहल अन्् कार्यकर्तेही दिसत नव्हते. काही मिनिटातच मुख्यमंत्र्यांच्या पायलटच्याही ही चुक लक्षात आलीय. अन्् या गोंधळाच्या अडीच मिनिटानंतर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर लगेचच आपल्या नियोजित जिनिंग-प्रेसिंग मैदानावरच्या हेलिपॅडकडे रवाना झाले. अन या गोंधळावर येथेच पडदा पडला. मात्र, प्रचाराच्या धबडग्यात या किस्स्याने काही काळ का होईना मुखमंत्र्यांसह दोन्ही पक्षांच्या नेत्या-कार्यकर्त्यांच मनोरंजन मात्र जरूर झालं.
बातम्या आणखी आहेत...