अकोला- रामदासपेठ अकोटफैल पोलिसांनी बुधवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवले. यादरम्यान त्यांनी अकोटफैल परिसरातून आणि रामदासपेठ परिसरातील काही संशयीत घरांची झडती घेतली असता त्यांना दोन तलवारी सापडल्या. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
पोलिस उपअधीक्षक प्रदीप चव्हाण परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्या नेतृत्वात बुधवारी कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी अकोटफैल परिसरातून सज्जन रंजन धामोडिया याच्याकडून तलवार जप्त केली, तर रामदासपेठ हद्दीतील विजयनगरातील पिया उर्फ प्रेम श्याम खरे भरत श्याम खरे याच्या घरातूनही पोलिसांनी दोन तलवारी जप्त केल्या आहे.
या दोघांविरुद्ध आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. रामदासपेठ पोलिस ठाण्याचे ठाणेदार सुभाष माकोडे ठाणेदार अनिल ठाकरे यांच्या पोलिस ताफ्याने ही कारवाई केली.