आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकाेला: जिल्ह्यामधील 78 गावांमध्ये होतो दूषित पाण्याचा पुरवठा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - जिल्ह्यात ७८ गावांना दूषित पाण्याचा पुरवठा करण्यात येत असल्याचा प्रकार तपासणी अंती उजेडात अाला अाहे. जिल्ह्यातील हजार १२४ ठिकाणच्या पाण्याच्या नमुन्यांपैकी १३६ ठिकाणी दूषित पाण्याचा पुरवठा हाेत असून, सर्वाधिक ३४ दूषित पाण्याचे नमुने अकाेला तालुक्यात आढळून अाले अाहेत.
 
पिण्याच्या दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आराेग्य धाेक्यात अाल्याचे प्रकार नेहमीच घडतात. पूर्णा नदी पात्रात तर कारखान्यांमधील विषारी साेडल्याप्रकरणी अनेकदा लाेकप्रतिनिधींकडून अांदाेलनेही करण्यात अाली. दूषित पाण्याचा मुद्दा यापूर्वी जिल्हा परिषदेच्या अनेक सभांमध्येही गाजला अाहे. प्रशासनाकडून ग्रामपंचायतला दूषित पाण्याचा पुरवठा हाेऊ नये, यासाठी ब्लिचिंग पावडरचा पुरवठाही करण्यात येताेे. मात्र तरीही दूषित पाण्याचा पुरवठा हाेत असल्याचे प्रकार उजेडात अाला अाहे. 
 
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आराेग्य विभागाकडून काही दिवसांपूर्वी पाण्याचे नमूने घेण्यात अाले. नमुन्यांची तपासणी केली. याते जिल्हयातील सातही तालुक्यातील ३० प्राथमिक आराेग्य केंद्राअंतर्गत असलेल्या ८०७ गावांमधील एकूण हजार ३२४ नमूने घेण्यात अाले. 
 
४१ गावे ब्लिचिंग पावडर विना : जिल्ह्यातील४१ गावांमध्ये ब्लिचिंग पावडरचा पुरवठा करण्यात अाला नसल्याची बाब उजेडात अाली अाहे. यामध्ये अकाेला तालुक्यातील १९, बार्शीटाकळी-५, बाळापूर-१५ अाणि पातूर तालुक्यातील दाेन गावांचा समावेश अाहे. अापातापा आराेग्य केंद्राअंतर्गत ६, पळसाे-५, कापशी-१, दहिहंडा-२, कान्हेरी-२, पिंजर-१, धाबा -२, उरळ -३, हातरूण-७,वाडेगाव-५, सस्तीमधील गावांमध्ये ब्लिचिंग पावडरचा पुरवठा हाेत नसल्याचे पाहणीत आढळले. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांमधून हाेत अाहे. 
ग्रामीण भागात सर्वाधिक दूषित पाणी : ग्रामीणभागातील ११८ तर नागरी भागातील १८ ठिकाणच्या पाण्याचे नमुने दूषित आढळून अाले अाहेत. सरासरी १० टक्के दूषित पाण्याचे नमुने आढळून अाले अाहे. यामध्ये अकाेला तालुका-१९, बार्शी टाकळी-१३, अकाेट-५, तेल्हारा- ९, बाळापूर-१८, पातूर-५ अाणि मूर्तिजापूर १२ टक्के आढळून अाले अाहेत. 
 
या गावांमध्ये आढळून अाले दूषित पाणी 
जिल्ह्यात एकूण ३० प्राथमिक आराेग्य केंद्राअंतर्गत असलेल्या गावांमध्ये हजार ३२४ नमुने घेण्यात अाले. यामध्ये १३६ नमुने दूषित असल्याचे आढळून अाले अाहे. यामध्ये अापातापा प्राथमिक आराेग्य केंद्राअंतर्गत ४, पळसाे-१२, कुरणखेड-७, कापशी ११, पिंजर-११, धाबा-८, कावसा-६, पंचगव्हाण-४, दानापूर-६, पारस-२४, वाडेगाव-३, बाभूळगाव-२, अालेगाव-३, मळसूर-१, पारद-१० धाेत्रा येथील ठिकाणांचा समावेश अाहे. प्राथमिक अाराेग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावांचा विचार केल्यास सर्वाधिक दुषित पाण्याचा पुरवठा कापशी अाराेग्य केंद्रांतर्गत असलेल्या १४ गावांमध्ये हाेताे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...