आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महानगराध्यक्ष निवड; नेते करणार सत्याग्रह,दुसऱ्या फळीतील नेत्यांचा निवडीला तीव्र विराेध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला- काँग्रेस महानगराध्यक्ष निवडीचा वाद चिघळला असून, निवडीच्या विरोधात सत्याग्रह करण्यात येणार असल्याचे काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. काँग्रेस महानगराध्यक्षपदी बबनराव चौधरी यांची निवड झाल्याने पक्षातील एकनिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे नेत्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला प्रामुख्याने काँग्रेसचे महासचिव राजेश भारती, युवक काँगेसचे प्रदेश महासचिव डॉ. झिशान हुसने, महासचिव प्रकाश तायडे, नगरसेविका उषा विरक उपस्थित होत्या.
गत आठवड्यात प्रदेश काँग्रेसकडून अकोल्यासह राज्यातील काही महारानगराध्यक्षांची निवड करण्यात आली. अकोला महानगराध्यक्ष पदाची माळ माजी आमदार बबनराव चौधरी यांच्या गळ्यात पडली. सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिकेच्या निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर महानगराध्यक्षपदी युवांची वर्णी लागणे आवश्यक होते. मात्र, कार्यकर्त्यांशी संपर्क नसलेला, जनतेशी नाळ जुळलेल्या चौधरी यांच्या नेतृत्वात निवडणूक लढणे शक्य उर्वरित.पान
नसल्याचेकाँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या निवडीमुळे दुसऱ्या फळीसह कार्यकर्ते दुखावले अाहेत. विराेधी पक्षांशी रस्त्यावर उतरून लढणारे, नेतृत्व गुण असलेल्या पदाधिकाऱ्यांएेवजी संघटन काैशल्य नसलेल्या चाैधरींची निवड करण्यात अाली. केवळ वातानुकुलीत खाेलीत बसून कारभार हाकणाऱ्यांच्या ताब्यात संघटना गेल्यास पक्षाचे प्रचंड नुकसान हाेणार अाहे. या निवडीला विराेध करण्यात येणार असून, चाैधरी पदभार स्वीकरण्याच्या दिवसापासून अामरण उपाेषण करण्यात येणार असल्याचे नेत्यांनी जाहीर केले. उपाेषण पहिले प्रदेशाध्यक्ष अाबासाहेब खेडकर यांच्या पुतळ्याच्या चरणी बसून करण्यात येणार अाहे. हे सत्याग्रह अांदाेलन मुंबई, दिल्लीतही करण्यात येणार असल्याचे नेत्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला. प्रदेश महिला काॅंग्रेस महासचिव डाॅ. वर्षा बडगुजर, अविनाश देशमुख, अंशुमन देशमुख, अाकाश कवडे, युवक काॅंग्रेसचे महासचिव पराग कांबळे, शेख अब्दुल्लाह उपस्थित हाेते.
कार्यपद्धतीलाफाटा : काॅंग्रेसमध्येलाेकशाही असून, निवडीबाबत कार्यकर्ते, पदाधिकारी जनतेची मतेही विचारात घेतली जातात. प्रसंगी निवडणूक घेतली जाते. एखाद्या निवडीच्या वेळी पक्ष निरीक्षक तीन ते चार नावांबाबत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतात. त्याैपकी एका नावावर शिक्कामाेर्तब करतात. यावेळीही निवडीसाठी राजेश भारती, निखिलेश दिवेकर उषा विकर यांची नावे प्रदेशस्तरावर पाठविण्यात अाली हाेती. मात्र अाता झालेल्या निवडीच्या वेळी उपराेक्त पद्धतीचे पालन करण्यात अाले नाही, असा अाराेप काॅंग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषदेत केला.

पक्षश्रेष्ठींना कळविल्या भावना : काॅंग्रेसमहानराध्यपदी बबनराव चाैधरी यांची निवड झाल्यानंतर दुसऱ्या फळीतील नेत्यांनी काॅंग्रेस पक्ष श्रेष्ठींची भेट घेतली. पक्ष श्रेष्ठींना निवडीबाबत अकाेल्यात नाराजी पसरल्याचे सांगितले. यावर पक्ष श्रेष्ठींनी तुतार्स तरी काेणताही ठाेस निर्णय घेतलेला नाही. प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण, माेहन प्रकाश, राधाकृष्ण विखे पाटील, अरूणजी मुगदिया, वाजदजी मिर्झा हे याेग्य निर्णय घेतील, असा विश्वासही नेत्यांनी पत्रकार परिषदेत बाेलून दाखविला.

वाचला चाैधरीच्या विराेधात पाढा
काँग्रेस नेत्यांनी बबनराव चाैधरी यांच्या विराेधात पाढाच वाचला. काॅंग्रेसने चाैधरींना िवधान परिषदेचे सदस्यत्व बहाल केल्यानंतरही त्यांनी सन १९९९मध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते विधान सभेच्या चिखली मतदारसंघातून राकाॅंकडून निवडणूक लढवली. मात्र, ते पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी जनसुराज्य पक्षात प्रवेश केला. सन १९९९ ते २०१३ या कालावधीत त्यांनी काॅंग्रेसच्या विराेधात काम केले. विधानसभा निवडणुकीत तर त्यांनी पक्षाच्या अध्यक्षा साेनिया गांधी यांच्यावर चिखलफेक केली. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर त्यांनी गंभीर अाराेप केल्याचे नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पक्ष वाढीसाठी प्रयत्न
माझे काॅंग्रेसमध्ये काेणाशीच मतभेद नाहीत. पक्षात माझ्याबद्दल, निवडीबाबत नाराजी असल्यास ती दूर करण्यात येईल. सर्वांना साेबत, विश्वासात घेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करू. बबनरावचाैधरी, महानराध्यक्ष काॅंग्रेस
बातम्या आणखी आहेत...