आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी गोदामातील माल पाण्यात, व्यवस्थापनाचे होतेय दुर्लक्ष, हमालांना काम करताना येतात अडचणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- सरकारी अधिकाऱ्यांच्या कॅबिनेटची दरमहा रिपेअरिंग केल्या जाते. मात्र, जिल्ह्यात येणाऱ्या धान्यासाठी कोणतीही चोख व्यवस्था नसल्याने गोरगरिबांचे धान्य पाण्यात भिजत असल्याचे वास्तव गुरुवारी केलेल्या पाहणीतून समोर आले आहे. केंद्रीय भंडार निगम शासकीय धान्य गोदामाची दयनीय अवस्था झाली असून, आतील मालाला दुर्गंधी सुटली आहे. याशिवाय विक्रीसाठी आणलेले धान्यही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात आले आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होत असतानाही बाजार समिती प्रशासनाने कुठलीही पर्यायी व्यवस्था केलेली दिसून येत नाही.

शासन गोरगरिबांना सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्न करते. मात्र, हे धान्य सुस्थितीत ठेवण्यासाठी अत्याधुनिक गोदामे शासनाकडे नसल्याचे वास्तव "दिव्य मराठी'च्या पाहणीत १३ ऑगस्ट रोजी दिसून आले. केंद्र सरकारच्या नियंत्रणात असलेल्या केंद्रीय भंडार निगम अंतर्गत असलेली दीडशे गोदामे शहरातील तारफैल भागात आहेत. गोदाम ३५ वर्षांपूर्वी बांधण्यात आली आहेत. यातील ५० टक्के गोदामे जीर्ण झाली आहेत. जुन्या पद्धतीची गोदामे असल्याने कोणतीही अत्याधुनिक सुविधा या ठिकाणी नाही. यामध्ये जिल्ह्यासाठी केंद्र सरकारकडून येणारे धान्य, खते इतर माल ठेवण्यात आला आहे. यासारखीच राज्य सरकारच्या गोदामांची तीच स्थिती झालेली दिसून येते.

भंडारनिगमच्या गोदामामध्ये पाणीच पाणी : तारफैलभागातील केंद्रीय भंडार निगमच्या गोदामामध्ये पाणीच पाणी साचले आहे. धान्य गोदाम हे जुन्या पद्धतीचे असून, या ठिकाणी पुरेसा प्रकाश येत नाही. शिवाय फरशी उखडलेली असल्याने धान्याचे पोते आणतानाच फाटतात. ती तशीच ठेवली जातात. त्यामुळे उंदीर, घूस आदी प्राणी धान्याची नासाडी करत आहे. आजच्या तारखेत गोदामाची एखाद्या खंडरसारखी स्थिती झाली आहे.
शासकीय धान्य गोदामाच्या दुरवस्थेबाबत कुठलीही तक्रार नाही. चिखलामुळे वाहने अडकलीत, असे एेकिवात नाही. '' अनिलटाकसाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला.

रस्ता तयार करावा
गोदामातयायला चांगला रस्ता नसल्याने बरेचदा वाहन चिखलात फसते. अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन चांगला रस्ता तयार करावा.'' गौतमशिंदे, हमाल

गैरसोयींकडे दुर्लक्ष
बाजारसमितीत माल ठेवण्यासाठी होत असलेली गैरसोय चिंताजनक आहे. व्यापाऱ्यांसाठी केलेल्या व्यवस्थेप्रमाणे शेतकऱ्यांसाठीसुद्धा व्यवस्था करायला हवी.'' श्रीकृष्णठोंबरे, शेतकरी, कान्हेरी सरप.

साखर, गव्हाचे पोते जमिनीवरच
गोदामामध्येसाखर, गव्हाचे पोते जमिनीवरच ठेवलेले दिसून आले. त्या ठिकाणी साधी ताडपत्रीही नाही. त्यामुळे या धान्याला दुर्गंधी सुटली आहे. यामुळे मालाची धान्याची नासाडी होत आहे. मात्र, याकडे व्यवस्थापनाचे दुर्लक्ष झालेले दिसून येते.

चिखलातून रस्ता
जिल्हाधिकारीकार्यालयाच्या मागील बाजुस असलेल्या गोदामाकडे जाणारा रस्ता चिखलातून जातो. पावसाळ्यात या रस्त्याने वाहन नेताना त्रासदायक ठरते. वारंवार याबाबत तक्रारी होऊनही कुणीही दखल घेण्यास तयार नाही. परिणामी, वाहन अडकल्यास हमालांनाच डोक्यावर माल उचलून न्यावा लागत असल्याचे वास्तव आहे.

धान्याला सुटली दुर्गंधी
गेल्याआठवड्यात आलेला हा माल दुर्गंधीयुक्त असल्याचे आढळून आले, तर तांदूळ गव्हाचा दर्जाही निकृष्ट असल्याचे दिसून आले. गहू तांदूळ सुस्थितीत ठेवण्यात आल्याने त्याची नासाडी होत आहे. पोते फाटलेली असून, उंदीर ताव मारत आहेत. तांदळाच्या पोत्यांच्या बाजूलाच जुनी कार्टून बॉक्स ठेवण्यात आल्याने त्यात उंदरांचे वास्तव्य आहे.

शेतकऱ्यांचा माल उघड्यावरच
अकोलाकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेला माल शेतकऱ्यांना स्वत:हून झाकून ठेवण्याची वेळ आली आहे. बाजार समितीने बांधलेल्या शेडमध्ये व्यापाऱ्यांनी आपला माल ठेवला आहे. शेतकऱ्यांना माल उघड्यावर ठेवावा लागत आहे.

अग्निरोधक यंत्रही निकामीच
केंद्रीयधान्य गोदामाच्या परिसरात कापसाच्या गोदामाच्या बाहेर लावलेले अग्निरोधक यंत्रेही निकामी झालेले आहेत. ते आऊटडेटेड झालेले दिसून आले. त्यामुळे आतमध्ये आग लागली, तर कोणतीही पर्यायी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली नाही.