आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीस वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाळापूर - अकोला येथील रहिवासी असलेल्या ३० वर्षीय युवकाचा बाळापूर शहरानजिक असलेल्या भिकुंड नदीच्या पात्रात आज दुपारच्या दरम्यान मृतदेह आढळून आला.
बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सदर मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला. मृतक हा अकोला येथील गायत्रीनगरमधील रहिवासी असून, त्याचे नाव भानुदास अंबादास जुनगडे असल्याचे समजले. या प्रकरणी मृतकाचा भाऊ किशोर जुनगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास बाळापूर पोलिस करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...