आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला : कर्जमुक्तीच्या पोस्टरचा वाद संपेना; सेनेने नाक दाबल्याने सरकारने तोंड उघडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 अकोला - कर्जमुक्तीच्या घोषणेनंतर आता भाजप - शिवसेनेमध्ये श्रेयवादाचे राजकारण तापले आहे. कर्जमुक्तीवरुन मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देणारे भाजपने लावलेले पोस्टर शिवसेनेने फाडल्यानंतर आता सेना नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना धन्यवाद देणारे फलक लावले आहेत. 
 
शिवसेनेने नाक दाबलं म्हणून सरकारचे कर्जमुक्ती जाहीर करण्यास तों उघडलं, अशा शब्दात सेनेने भाजपवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजप-शिवसेनेतील दरी आणखी वाढणार आहे, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
बातम्या आणखी आहेत...