आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरगुती गॅसचे वितरण: सव्वा दोन हजार महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - वनपरिक्षेत्रातील वृक्षांची होणारी कत्तल थांबावी, वातावरणातील प्रदूषण कमी व्हावे, महिलांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी वन विभागाने पुढाकार घेऊन विशेष घटक योजनेंतर्गत सन २०१६-१७ या एका वर्षात सर्वसाधारण जातीसह अनुसूचित जातीच्या तब्बल हजार ३९४ महिलांना घरगुती गॅस कुकींगचे वाटप केले आहे. यासाठी वन विभागाने कोटी लाख ९८ हजार ८०० रुपये खर्च केले आहेत. घरगुती गॅस मिळाल्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. शिवाय झाडांची कत्तल थांबवून महिलांचे आरोग्य अबाधीत राहण्यास मदत मिळणार आहे.
 
बुलडाणा जिल्ह्याला निसर्गाने दोन्ही हाताने भरभरून वन संपदा बहाल केली आहे. बुलडाणा जिल्ह्यात अंबाबरवा, ज्ञानगंगा लोणार असे तीन अभयारण्य आहेत. शिवाय लाखो हेक्टर क्षेत्रावर पसरलेले वन परिक्षेत्र आहे. अभयारण्यासह वन परिक्षेत्रात साग, निंब, सिसम, पळस, चिंच, मोह अशी अनेक मौल्यवान वृक्ष असून अनेक औषधोपयाेगी वनस्पती आहेत. शिवाय या परिक्षेत्रात वाघ, बिबट, तडस, हरिण, अस्वल, लांडगा, रानडुक्कर, रोही आदी वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे. वन परिक्षेत्राचे रक्षण करण्यासाठी जिल्ह्यात बुलडाणा, देऊळगावराजा, मेहकर, घाटबोरी, मोताळा, खामगाव जळगाव जामोद अशी सात वन परिक्षेत्र कार्यान्वीत करण्यात आली आहेत. 
परंतु वन परिक्षेत्राशेजारी असलेल्या गावांमधील नागरिक जळतणासाठी मोठ्या प्रमाणावर वन परिक्षेत्रातील झाडाची कटाई करतात. आजही ग्रामीण भागातील बहुतांश महिला चुलीवर स्वयंपाक करतात. त्यामुळे चुलीच्या धुरामुळे त्यांच्या आरोग्याला धोका पोहचत आहे. झाडाच्या कत्तलीला आळा बसून वातावरणातील प्रदुषण कमी व्हावे. तसेच महिलांचे आरोग्य अबाधीत राहावे, यासाठी शासनाने प्रधानमंत्री उज्वल योजना सुरू केली आहे. तर या योजनेंतर्गत वन विभागाने विशेष घटक योजना सुरू केली आहे. 
 
सन २०१६-१७ या एका वर्षात या योजनेंतर्गत जिल्ह्यातील हजार ३९४ महिलांना घरगुती गॅस सिलींडरचे वाटप करण्यात आले आहे. यासाठी वन विभागाने कोटी लाख ९८ हजार ८०० रुपये खर्च केले आहेत. घरगुती गॅस मिळाल्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. शिवाय गॅस वाटपामुळे झाडाची कटाई थांंबून पर्यावरणाचा होणारा ऱ्हास कमी होणार आहे. तसेच यामुळे ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य अबाधीत राहणार आहे. 
 
वन परिक्षेत्र नुसार करण्यात आलेले गॅस वाटप 
बुलडाणा वन परिक्षेत्रातील सर्व साधारण जातीच्या ३९७ लाभार्थ्यांना कुकींग गॅसचे वाटप करण्यात आले असून देऊळगावराजा ३२५, मेहकर ७०, घाटबोरी १९० , मोताळा २६८, खामगाव १०५ जळगाव जामोद वन परिक्षेत्रातील ९३ लाभार्थी महिलांना गॅसचे वाटप करण्यात आले आहे. तसेच बुलडाणा वन परिक्षेत्रातील ३३१, मेहकर २७०, घाटबोरी १३९, खामगाव ८५ जळगाव जामोद वन परिक्षेत्रातील अनुसूचित जातीच्या १० लाभार्थ्यांना गॅसचे वाटप करण्यात आले आहे. 
 
यावर करण्यात आलेला खर्च 
बुलडाणा २६ लाख ९९ हजार ६००, देऊळगावराजा २२ लाख १० हजार, मेहकर लाख हजार, घाटबोरी १२ लाख ९२ हजार ६००, मोताळा १८ लाख २२ हजार ४००, खामगाव लाख १४ हजार, लाख ३० हजार ४००, मेहकर लाख ७० हजार, जळगाव जामोद लाख हजार असे एकुण कोटी लाख ९८ हजार खर्च करण्यात आले आहे. 
 
अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यावर खर्च 
बुलडाणा वन परिक्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी २२ लाख ५० हजार ८००, मेहकर १८ लाख ३६ हजार, घाटबोरी लाख ४५ हजार २००, खामगाव लाख ७८ हजार जळगाव जामोद परिक्षेत्रातील लाभार्थ्यासाठी ७० हजार असा एकूण ५६ लाख ८० हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. 
 
पर्यावरणाचा ऱ्हास थांबण्यास मदत 
- विशेष घटकयोजनेतंर्गत या वर्षात जिल्ह्यातील हजार ३९४ लाभार्थी महिलांना कुकींग गॅसचे वाटप करण्यात आले आहे. यासाठी जवळपास एक कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. घरगुती गॅस मिळाल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास थांबून महिलांचे आरोग्य अबाधीत राहणार आहे.
’’ बी.टी. भगत, उप वनसंरक्षक 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...