आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धम्मकार्य गतिमान करण्यासाठी प्रत्येकाने त्याग करावा - भीमराव आंबेडकर यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रामणेर प्रशिक्षण शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर उपस्थित मान्यवर. - Divya Marathi
श्रामणेर प्रशिक्षण शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर उपस्थित मान्यवर.
अकोट- स्थानिक भीमनगरात आयोजित दहा दिवसीय श्रामणेर शिबिराचा समारोप एप्रिल रोजी झाला. समारोपीय कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांची विशेष उपस्थिती होती. 
 
अकोट येथे ३१ मार्च ते एप्रिलपर्यंत बौद्धाचार्य श्रामणेर प्रशिक्षण शिबिर; उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिर समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरांर्गत चैत्यभूमि मुंबईचे व्यवस्थापक पु. भन्ते बी. संघपाल थेरो यांच्या मार्गदर्शनात केंद्रिय शिक्षिका कैविशताई मेश्राम चंद्रपुर, करुणाताई नरवाडे, भुसावळ, संबोधी सोनकांबळे नांदेड यांनी प्रशिक्षण दिले. समारोपीय कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांनी आपल्या भाषनातून धर्मकार्य गतिमान करण्यासाठी प्रत्येकाने त्याग करणे गरजेचे आहे. देशामधे समता न्याय बंधुता निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठीच भारतीय बौद्ध महासभा धर्मकार्य समाजकार्याच्या माध्यमातून माणसं घडवण्याचे काम करत आहे, असे विचार व्यक्त केले.
 
 या प्रसंगी इंडियन बँकेचे सहाय्यक प्रबंधक अशोक नागदिवे यांनी ६१ श्रामणेर बौद्ध विहारांना बुद्ध त्यांचा धम्म हा ग्रंथ भेट दिले. तसेच अकोला येथील जाहीर सभेच्या फोटो अल्बमचे विमोचन भिमराव आंबेडकर भत्ते बी. संघपाल थेरो यांच्या हस्ते केले. या वेळी शिबिरात सहभागी प्रशिक्षणार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष रवींद्र दारोकार, महासचिव भीमराव खंडारे, कोषाध्यक्ष राजाभाऊ लबडे, अकोट तालुकाध्यक्ष सतिष घनबहादूर, शहराध्यक्ष हरिश्चंद्र वाघमारे, भारिप बमसंचे जिल्हा कार्याध्यक्ष काशिराम साबळे, नगराध्यक्ष हरीनारायण माकोडे,इंगोले, दिनेश घोडेस्वार, सुभाष तेलगोटे, रमेश तेलगोटे, बी. टी. धांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन भालचंद्र विरघट, प्रास्ताविक बी. टी. धांडे यांनी केले. आभार मिलिंद तेलगोटे यांनी मानले. कार्यक्रमासाठी मिलिंद तेलगोटे, सुभाष तेलगोटे, सुशिलाबाई वानखडे, कैलास थोरात, नारायण भगत, विश्वास पाचपाटील, नालिनी धांडे, मंगेश तेलंगोटे, दिलीप लायसे, प्रा. भाष्कर चक्रनारायण, मोहन तेलगोटे, गौतम पडघामोल,राहूल तायडे, शशीकला पाखरे, विद्या वानखडे, माया तेलगोटे, संगीता पोहरकार, रंजना तेलगोटे, रमा तेलगोटे, मथुरा तेलगोटे, भानुदास तेलगोटे, उत्तमराव तेलगोटे, हरिभाऊ तेलगोटे, देविदास तेलगोटे, सुनील वानखडे, महेंद्र तेलगोटे, पी. के. तेलगोटे, अनिल तेलगोटे यांचे सहकार्य लाभले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...