आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकाेला: बंधाऱ्याची किंमत वाढवण्याचा घाट हाणून पाडला, इतिवृत्तावरून घमासान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - सावरगाव येथील काेल्हापुरी बंधाऱ्यांची किंमत वाढवण्याचा घाट बुधवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापन समिती स्वच्छता समितीच्या सभेत हाणून पाडण्यात अाला. या बंधाऱ्याबाबत केलेल्या वक्त्याचा उल्लेख इतिवृत्तात असल्याने भारिप-बमसंचे सदस्य गाेपाल काेल्हे संबंधितांना चांगलेच धारेवर धरले.
 
सत्ताधारी भारिप-बमसंचा प्रशासकीय वचक नसल्याने अनेक याेजना रखडल्या अाहेत. अार्थिक वर्ष संपण्यासाठी दीड महिना शिल्लक राहिला असतानाही जवळपास ८५ टक्के िनधी अखर्चित असून, बहुतांश याेजना रखडल्या अाहेत. या दाेन्ही मुद्यांवरून सत्ताधारी भारिप-बमसंसह त्यांना समर्थन देणारे सदस्य शनिवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत अाक्रमक झाले हाेते. काही सदस्यांनी तर याेजना रखडल्याचे खापर सत्ताधाऱ्यांनाच फुटेल, अशा शब्दात भीती व्यक्त केली हाेती, असे असतानाच अाता सावरगाव येथील काेल्हापुरी बंधाऱ्याला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा घाट घालण्यात अाल्याची बाब उजेडात अाली अाहे. याबाबत बुधवारी झालेल्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत चर्चा झाली. अखेर याबाबतचा ठराव घेण्यात अाला नाही. सभेला अध्यक्षा संध्या वाघाेडे, उपाध्यक्ष जमीर उल्ला खान, कृषी सभापती माधुरी गावंडे, समाजकल्याण सभापती रेखा अंभाेरे, महिला बाल कल्याण सभापती देवकाबाई पाताेंड, शिक्षण सभापती पुंडलीकराव अरबट, गाेपाल काेल्हे, मनाेहर हरणे यांच्यासह अधिकारी उपस्थित हाेते. 
 
असा अाहे घाेळ: सावरगावयेथील काेल्हापुरी बंधाऱ्याची मूूळ किंमत जवळपास ३३ लाख रुपये हाेती. त्यानंतर ४३ लाख ४९ हजार १०० रुपये एेवढ्या किंमतीचे सुधारित अंदाजपत्रक तयार केले. या अंदाजपत्रकास लघुसिंचन (जलसंधारण) मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी तांत्रिक मंजुरीही दिली. बंधाऱ्याची सिंचन क्षमता ६४ हेक्टर अाहे. या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मंजुरी मिळण्यासाठी ३१ डिंसेंबर राेजी झालेल्या जल व्यवस्थापन स्वच्छता समितीच्या सभेत ठराव मांडण्यात अाला. सूचक म्हणून सरला मेश्राम तर अनुमाेदक म्हणून राजेश खाेने हाेते. त्यानंतर २४ जानेवारी राेजी झालेल्या सभेत ३१ डिंसेंबर राेजी झालेल्या सभेचे इतिवृत्त मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात अाले. यामध्ये हा ठराव अाचारसंहिता संपल्यानंतर पुढील बैठकीत ठेवण्यात यावा, असे सदस्य गाेपाल काेल्हे यांनी सुचवल्याची नाेंद केली. त्यामुळे बुधवारी झालेल्या सभेत काेल्हे यांनी यावर अाक्षेप घेतला. 

जलकुंभ ठरले शाेभेची वस्तू 
भारतीय जनता पक्षाचे सदस्य मनाेहरराव हरणे यांनी शिर्ला, बेलुरा येथील पाणीपुरवठा याेजनेंतर्गत बांधण्यात अालेल्या जलकुंभाबाबतचा मुद्दा उपस्थित केला. बेलुरा येथील याेजनेसाठी ५९ तर शिर्ला येथील याेजनेसाठी ६४ लाख रुपये खर्च करण्यात अाल्यानंतरही ग्रामस्थांना पाणी का मिळत नाही, असा सवाल सदस्य मनाेहरराव हरणे यांनी उपस्थित केला. 
 
हस्तांतरणासाठी हाेणार संयुक्त पाहणी 
तुलंगा येथील बंधाऱ्याबाबत भाजपचे सदस्य मनाेहरराव हरणे यांनी जाब विचारला. हा बंधारे लघुपाटबंधारे विभागाने (स्थानिक स्तर) सन २००४ मध्ये बांधला हाेता. मात्र, बंधारा जिल्हा परिषदकडे हस्तांतरित झाला नाही. मात्र, हस्तांतरणाबाबत दाेन्ही विभाग ठाेस सांगण्यास तयार नाहीत. त्यामुळे अाता हस्तांतरणासाठी संयुक्त पाहणी करण्याचा निर्णय सभेत घेण्यात अाला. 
बातम्या आणखी आहेत...