आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2017-18 चा जि‍ल्हा वि‍कास आराखडा 106 कोटी रुपयांचा, 22 नोव्हेंबरच्या बैठकीत उमटणार मोहोर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्ह्यातील वि‍विध शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय निमशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात १०६ कोटी रुपयांची विकासकामे केली जाणार आहेत. रस्ते, पूल, इमारतींचे बांधकाम, सि‍चन कृषि-उद्योगांना वीजपुरवठा अादी पायाभूत सुविधांशिवाय शि‍क्षण आणि आरोग्य क्षेत्राशी नि‍गडित कामे यामध्ये प्रस्तावित करण्यात आली आहेत. या कामांना जि‍ल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) लघुगटाने रविवारी मंजुरी दिली. या मंजुरीवर २२ डि‍सेंबरला होणाऱ्या डीपीसीच्या बैठकीत अंतिम मोहोर उमटवली जाईल. सन २०१७-१८ चा जि‍ल्हा वि‍कास आराखडा निश्चित करण्यासाठी रविवारी सकाळी िजल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी सविस्तर चर्चेअंती हा आराखडा निश्चित करण्यात आला. प्रारंभी िजल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर यांनी १०५.८४ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला.
लघुगटाचे प्रमुख तथा अकोटचे आमदार प्रकाश पाटील भारसाकळे हे या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय जि‍ल्हा परिषद सदस्य अक्षय लहाने, मनपा स्थायी समितीचे सभापती विजय अग्रवाल आदी डीपीसी सदस्य, जि‍ल्हाधिकारी जी. श्रीकांत, महावितरणचे अधीक्षक अभियंता, मनपा आयुक्त अजय लहाने, सार्वजनिक बांधकाम वि‍भागाचे कार्यकारी अभियंता निखिलेश चव्हाण, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सुभाष पवार आदींनीही चर्चेत सहभाग नोंदवला. प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

मागीलआराखडा पोहोचला होता १४ कोटींपर्यंत : राज्यशासनाने आखून दि‍लेल्या सूत्रानुसार, मावळत्या वर्षाचा (२०१६-१७) जि‍ल्हा वि‍कास आराखडा १००.२० कोटी रुपयांचा होता. राज्यस्तरीय बैठकीत त्यात वाढ झाल्याने ही रक्कम १४१.९४ कोटींवर पोहोचली होती. दरम्यान, शासनानेच आखून िदलेल्या सूत्रानुसार यावर्षीचा वि‍कास आराखडा १०५.८४ कोटींचा मांडण्यात आला असून लघुगट, डीपीसी त्यानंतर अंतिमत: होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीअंती तो निश्चितच १५० कोटींवर जाणार असल्याचा नियोजन विकास क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे.

संपूर्ण डीपीसी २२ डि‍सेंबरलाच
लघुगटाने आज संमत केलेला मसुदा संपूर्ण डीपीसीकडून मंजूर करुन घ्यावा लागणार आहे. त्यासाठी २२ डि‍सेंबरला बैठक होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकांची आचारसंहिता नव्या वर्षात केव्हाही सुरु होणार असल्याने २२ डिसेंबर रोजी ही बैठक घेतली जावी, असा प्रस्ताव पुढे आला होता. डीपीसीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी त्याला दुजोरा दि‍ला आहे.

नव्या नगरसेवकांना मिळणार प्रतिनिधित्व
जिल्हानियोजन समितीची आगामी बैठक ही मनपा नगरपरिषदांच्या सदस्यांची शेवटची बैठक असेल. कारण त्यापुढच्या बैठकीत नव्या नगरसेवकांमधून िनवडल्या जाणाऱ्या प्रतिनिधींना संधी मिळणार आहे. प्रशासकीय पातळीवर तशी प्रक्रियाही सुरु झाली आहे. नगरपरिषदांची निवडणूक अलीकडेच पार पडल्याने डीपीसीसाठी नवे प्रतिनिधी िनवडणे आवश्यक झाले आहे. दोन महिन्यानंतर महापालिकेबाबतही असेच होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...