आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंचखेड येथील जि. प. प्राथमिक शाळेची ‘आयएसओ’कडे वाटचाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संख्या वाचन करताना चिंचखेड येथील जि. प. शाळेचे विद्यार्थी. - Divya Marathi
संख्या वाचन करताना चिंचखेड येथील जि. प. शाळेचे विद्यार्थी.
खामगाव - कॉन्व्हेंट संस्कृतीच्या युगात आता जिल्हा परिषदेच्या शाळांनीही कात टाकणे सुरू केले आहे. शेगाव तालुक्यातील चिंचखेड मराठी प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून या शाळेने आएसओकडे वाटचाल सुरू केली आहे. १८ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानांकन प्रमाणपत्रासाठी मानांकन करण्यात आले आहे. 
 
जिल्हा परिषद शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता विद्यार्थी संख्या टिकवण्यासाठी शासनाने जून २०१५ पासून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम सुरू केला. जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा घसरल्यानंतर शासनाने हे पाऊल उचलले. मात्र चिंचखेड येथील शाळेने यापूर्वीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले आहे. चिंचखेड हे ९५० लोकसंख्येचे गाव आहे. येथे जि. प. ची वर्ग ते पर्यत शाळा असून पटसंख्या ६६ आहे. तीन शिक्षकांची मान्यता असताना सध्या दोन शिक्षक कार्यरत आहे. मुख्याध्यापक प्रमोद इंगळे हे वर्ग सांभाळतात तर शिक्षक गणपत राठोड हे इयत्ता ली ते री पर्यंत शिकवतात. दोन्ही शिक्षकांचे कामकाजाचे नियोजन वाखाण्याजोगे आहे. येथे विद्यार्थी शाळेत प्रवेश करताच त्यांच्या कामकाजाला सुरुवात होते. प्रत्येक विद्यार्थी स्वच्छतेसोबतच कचरा वेचताना पडलेली झाडाची पाने मोजून ज्ञानरचनावादी शिक्षणाला महत्व देतात. या शाळेत अप्रगत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी लेखनीचा वापर करता बोटाने शब्द गिरवणे, करपल्लवी अंतर्गत शब्दांची ओळख, अॅबेकसवरुन संख्या वाचन इतर उपक्रमान्वये शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यात येत आहे. आयएसओसाठी निकष ठरवण्यासाठी १८ एप्रिल रोजी मुंबई येथील पथकाने भेट दिली. यावेळी शाळेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. शाळेच्या प्रगतीकरीता गटशिक्षणाधिकारी श्रीराम उमाळे, केंद्र प्रमुख विनोद ठाकरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पंजाबराव भारंबेे ग्रामस्थांचे सहकार्य आहे. 
 
शिक्षक राठोड यांची मुलेही शाळेत 
आज नोकरदार वर्गाची मुले शहरी, कॉन्व्हेंट संस्कृतीत वाढत आहेत. खासगी शाळांत मुलांवर लाखो रुपये खर्च करत आहेत. मात्र चिंचखेड शाळेचे शिक्षक गणपत राठोड यांची मुले जि.प. च्या शाळेत आहेत. मुलगी इयत्ता वीत तर मुलगा पहिल्या वर्गात याच शाळेत शिकत आहेत. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...