आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय वसतीगृहात मुलींची सुविधांअभावी होतेय परवड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समाजकल्याण कार्यालय अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात समस्या मांडताना विद्याार्थिनी. - Divya Marathi
समाजकल्याण कार्यालय अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात समस्या मांडताना विद्याार्थिनी.
बुलडाणा - सामाजिकन्याय विशेष सहाय्य विभागाने शासकीय वसतीगृहातील मुलींसाठी दिलेल्या सोयी सुविधा मिळत नसल्याने बुलडाणा हाजी मलंग बाबा दर्ग्याजवळील नवीन मुलींच्या वसतीगृहातील मुलींनी सोमवारी समाज कल्याण अधिकारी कार्यालय अपर जिल्हाधिकारी यांचे कार्यालयावर धडक भेट दिली. शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नसल्याची ओरड करतानाचा वर्ष झाले तरी निर्वाह भत्ता मिळत नसल्याची तक्रारही केली. शासकीय मुलींचे नवीन वसतीगृह हाजी मलंग दर्ग्याजवळ बुलडाणा येथे वर्ग ते डी.एड, पॉलिटेक्नीक मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी राहतात. आज त्यांना पिण्याचे पाणी अशुद्ध मिळाले. या पाण्यात शौचालयाचे पाण्याची दुर्गंधी येत असल्याची प्रमुख बाब लक्षात येताच विद्यार्थिनींनी समाज कल्याण अधिकारी कार्यालय गाठले. मात्र, त्यांना या ठिकाणी न्याय मिळाला नाही. अखेर सर्व विदयार्थीनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या. या ठिकाणी त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांची भेट घेतली. त्यांचेसमोर आपल्या अडचणी मांडल्या. तर आज मिळालेल्या अशुध्द पाण्याची तक्रारही केली. अखेर या बाबीची दखल घेत अपर जिल्हाधिकारी यांनी पालिका स्तरावर फोन करुन पाण्यात येणारे दूषित पाण्याचा मार्ग मोकळा करण्याचे सांगितले. हा प्रश्न तात्पुरत्या स्वरुपात सुटण्याचे आश्वासनानंतर विदयार्थीनींनी मात्र नाराजी व्यक्त केली. या वेळी निवेदनही देण्यात आले. निवेदनावर ३० विद्यार्थीनींच्या सहया आहेत. डी.एड इंजिनिअरींगच्या मुलींना परीक्षेपूर्वी असलेल्या सुट्टीच्या काळात वसतिगृहात राहू देत नाहीत. तर आठवी नववीच्या विद्यार्थिनींना फक्त दोनच रजिस्टर देण्यात आले आहेत. कचरा पेट्या नाहीत, दूरदर्शन संच नाही, दरवाजांना कडी नाही, हॉलमध्ये दिवाबत्ती नाही, पालक मेळावा होत नाही आदी सुविधा शासनाच्या २६ जुलै २०११ नुसार मिळत नाही. त्यामुळे वसतिगृहातील मुलींनी थेट सोमवारी जिल्हा समाजकल्याण अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयवार ठिय्या दिला. तेथे समाजकल्याण अधिकाऱ्यांसमोर आपल्या मागण्या मांडल्या. त्यांच्या पूर्ततेकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. 
 
या सुविधा मिळाल्या नाहीत 
विद्यार्थिनींनी सांगितले की, त्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळत नाही, टॉयलेटला फ्लश नाही, पुस्तके मिळालेली नाही, गरम पाणी नाही, वर्तमानपत्रे भेटलेली नाही, सकाळी वाजता मैदानावर जाऊ दिले जात नाही, निर्वाह भत्ता वर्षभरापासून मिळालेला नाही, शालेय गणवेश नाही, फळे मिळत नाही, संगणकाची व्यवस्था आहे पण वापरु दिल्या जात नाही, स्टेशनरी पूर्ण मिळाली नाही, मुलींच्या स्वच्छता प्रसाधनासाठी अतिरिक्त १०० रुपये मिळत नाही, सहलीचे पैसे मिळत नाही. 

असा आहे निर्वाह भत्ता 
विभागीय स्तरावर प्रत्येकी ८०० रुपये, जिल्हास्तरावर प्रत्येकी ६०० रुपये, तालुकास्तरावर प्रत्येकी ५०० रुपये निर्वाह भत्ता देण्यात येतो. तर मुलींसाठी स्वच्छता प्रसाधनासाठी अतिरिक्त १०० रुपये दरमहा देण्यात येतो. शालेय गणवेश प्रत्येकी दोन जोड रुपये ५०० प्रमाणे मिळतो महाविदयालयीन स्तरावर १,००० रुपये प्रमाणे मिळतो. अशा विविध सुविधा शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाने शासकीय वसतीगृहाकरता दिलेल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...