आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यामधील १९ लघु प्रकल्प अद्यापही कोरडेच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पाऊस अधून मधून हजेरी लावत असल्याने जुलै महिन्याचे २० दिवस लोटल्यानंतरही जिल्ह्यातील ३२ पैकी १९ लघु प्रकल्प अद्यापही कोरडेच आहेत. तर काटेपूर्णा, वान या मोठ्या प्रकल्पाच्या जलपातळीत अत्यल्प वाढ झाली आहे. तर मध्यम प्रकल्पाची पातळीही समाधानकारक नाही. त्यामुळे अद्यापही जोरदार पावसाची प्रतिक्षा शेतकऱ्यांसह नागरिक करीत आहेत. 
 
जिल्ह्याच्या आर्थिक उलाढालीत औद्योगिक वसाहतीसोबतच सिंचनाचा वाटाही मोठा ठरतो. जिल्ह्यातील दोन मोठे, तीन मध्यम आणि ३२ लघु प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो हेक्टर जमिन सिंचनाखाली येते तर जमिनीतील पाण्याच्या पातळीतही वाढ होते. त्याच बरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागतो. त्यामुळे पावसाळा सुरु झाला की जिल्ह्यातील जल प्रकल्पांच्या पातळीकडे जिल्हा वासीयांचे लक्ष लागते. यावर्षी जुन महिन्यात पावसाने थोडीफार हजेरी लावल्या नंतर उघडीप दिली. त्यामुळे पेरणी लांबली तर काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. जुलै महिन्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली होती. मात्र जिल्ह्यात अद्यापही जोरदार पाऊस झालेला नाही. पावसाच्या हलक्या सरी केवळ कोसळल्या. त्यामुळे जिल्ह्यातील जल प्रकल्पांच्या पातळीत फारशी वाढ झालेली नाही. तर लघु प्रकल्पांमध्ये अद्याप जिवंतसाठाही उपलब्ध झालेला नाही. या प्रकारामुळे शेतकऱ्यांसह नागरिक जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. 

आठलघु प्रकल्प पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पावसाची नोंद : पिंपळशेंडालघु प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात एक जुन पासून आता पर्यंत १० मिलिमीटर, पिंपळगाव चांभारे, इसापूर प्रत्येकी मिलिमीटर तर पिंपळगाव हांडे, सावरखेड प्रत्येकी मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर झरंडी, हिवरा, विश्वमित्री या लघु प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात एक जुन पासून पाऊसच झालेला नाही. 

१९ लघु प्रकल्प अद्याप कोरडेच 
जिल्ह्यातील ३२ पैकी बोरगाव, सिसा उदेगाव, कुंभारी, चिचपाणी, भिलखेड, धारुर, पिंपळशेंडा, जनुना, घोटा, मोऱ्हळ, हातोला, गावंडगाव, सावरगाव बांध, कसुरा, तामसी, शहापूर बृहत, दगडपारवा, विश्वामित्री, सुकळी या प्रकल्पांमध्ये अद्यापही जिवंतसाठा उपलब्ध झालेला नाही. 

प्रकल्पातील जलसाठा असा 
काटेपूर्णा१६.४९ दलघमी 
वान ४१.३२ दलघमी 
मोर्णा ६.९२ दलघमी 
निर्गुणा ४.२४ दलघमी 
उमा ०.१० दलघमी 

 
बातम्या आणखी आहेत...