आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत ज्ञानेश्वर महाराज सेवा समितीचे वैद्यकीय पथक रवाना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पंढरीच्या वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर सेवा समितीचे फिरते पथक रविवारी, १८ जूनला रवाना झाले. आचार्य शिव दत्त, गो कथाकार मोहन महाराज, आमदार गोवर्धन शर्मा, समितीचे अध्यक्ष प्रकाश वाघमारे यांनी वाहनांची पूजा केल्यानंतर पथक मार्गस्थ झाले. 
 
प्रारंभी प्रकाश वाघमारे यांनी पथकाच्या वाटचालींची माहिती दिली.. गिरीश पंड्या यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. १८ जून ते जुलै १७ पर्यंत पथक सेवा देईल. तीन वाहने औषधांसह रवाना केली. उरळी कांचनपासून पथक सेवा पुरवते. रविवारी परळी वैजनाथला पथकाचा मुक्काम राहील. त्यात डॉ. राजकुमार बुले, डॉ. विजय घंगाळे, डॉ. शिवचरणसिंह ठाकूर, डॉ. गीता घंगाळे, डॉ. मुरलीधर जळमकार, डॉ. जनार्दन वानखडे, डॉ. रमेश बरडे, डॉ. सचिन पारसकर, डॉ. दिनेश काकड, डॉ. अमोल दिवाने, डॉ. प्रणाल पाटील, डॉ. शरद चौधरी यांचा समावेश आहे. गजानन कथलकार, प्रमिला डोईफोडे, गोपाल घाटे, गणेश शिंदे, दत्ता शिंदे, बाळकृष्ण वाघमारे, रोशन पोटे, पवन घाटोळे, सूरज नवघरे, विठ्ठल वाघ, निरंजन बोर्डे, सदाशिव खोटरे, माराेती मते, मंगेश वाघमारे, विजय मोडक, प्रकाश मेतकर, हरिभाऊ तवाळे, देवकाबाई गिरे, सुनंदा रायलकर, वत्सला राखोंडे, साहेबराव शेळके, दिनकरराव गावंडे, गजानन हेमने, संजय वाघमारे, मारुती वाघमारे, अमोल वाघमारे, दादा साबळे सेवा देतात. कार्यक्रमाला राजेंद्र जोगळेकर, प्रा. विवेक बिडवई, हिंमतराव गावंडे, रमण हेडा, निशिकांत हिवरखडेकर उपस्थित होते. 

 
बातम्या आणखी आहेत...