आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवयवदानासाठी डॉक्टरांचा संकल्प

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गिरी संकल्पपत्र भरून देताना. - Divya Marathi
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गिरी संकल्पपत्र भरून देताना.
अकोला- १५ऑगस्ट ते २६ जानेवारीदरम्यान अवयवदान चळवळ राबवली जात आहे. यादरम्यान पाच हजार व्यक्तींकडून अवयवदानाचे अर्ज भरून घेतले जाणार आहेत. अवयवदान चळवळीत बहुसंख्येने सहभाग नोंदवा, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. एच. गिरी यांनी केले आहे.

राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त अकोल्यात अवयवदान चळवळीचा शुभारंभ आज, १३ ऑगस्ट रोजी वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आला. अधिष्ठाता डॉ. कार्यकर्ते जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गिरी यांनी अवयवदानाचा संकल्प अर्ज भरून दिला. या वेळी अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्र काळे, नेत्रतज्ज्ञ डॉ. अतुल बिहाडे उपस्थित होते. संपूर्ण देहदानसुद्धा आपण करू शकतो. या उदात्त हेतूने अवयवदानाची संकल्पना पुढे आली आहे. परंतु, त्याचे प्रमाण आजही खूप कमी आहे. अवयवदानासारखे दान नाही. अवयवदान केले तर एखाद्या गरजू रुग्णाचे आयुष्य सुखी होऊ शकते. ही भावना रुजवण्यासाठी रोटरी क्लब ऑफ अकोला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालयासह जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान चळवळ राबवली जात आहे. या अभियानाअंतर्गत गुरुवारी डॉक्टर, वैद्यकीय स्टाफ यांचे संकल्प अर्ज भरून घेण्यात आले.

अवयवदानासाठी पुढे या : अवयवदानासाठीपुढे येऊन आपला संकल्प अर्ज भरून द्या, असे आवाहन अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्र काळे नेत्रतज्ज्ञ डॉ. अतुल बिहाडे यांनी केले आहे. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी ८०८७९३८०८५ ९८५०३१६३२५ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.