आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्टेट एक्साईज’: 38 दुकानांचे बस्तान आता नव्या जागेमध्ये, आणखी दीड डझन प्रस्ताव तयार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - देशी-विदेशीमद्य विक्रीच्या माध्यमातून कर गोळा करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाची चिंता बऱ्यापैकी कमी झाली आहे. स्थलांतराचा पर्याय स्वीकारुन ३८ दुकाने नव्या जागेत सुरू झाली असून आणखी दीड डझन दुकानांचे प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. 
 
दरम्यान स्थलांतराच्या घडामोडीमुळे जिल्हाभरातील एकूण मदिरालयांची संख्या ६८ वर पोचली आहे. गेल्या महिन्यात ती ६० वर स्थिरावली होती. दुकानांची संख्या वाढली की आपोआपच खरेदी वाढते आणि पर्यायाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर संकलनातही वाढ होते. त्यामुळे निकट भविष्यात या विभागाचा तोटाही कमी होणार आहे. 
 
राष्ट्रीय राज्य महामार्गांपासून पाचशे मीटरच्या अंतर बंदीमुळे जिल्ह्यातील मदिरालयांची संख्या २५४ वरुन थेट ३० वर आली होती. नंतरच्या काळात काही दुकानदारांनी केलेला अंतर्गत रचनेतील बदल आणि काहींनी निवडलेला स्थलांतराचा पर्याय यामुळे ही संख्या आता ६८ वर पोचली आहे. 
 
बियर बार आणि दारु दुकानांची संख्या वाढल्याने मद्य शौकीनांची भटकंतीही कमी झाली आहे. पूर्वी लांबवर एकच मदिरालय सुरू होते. त्यामुळे सर्व शौकीनांना त्यावरच विसंबून राहावे लागायचे. आता दुकानांची हद्द काहीशी त्यांच्या हद्दीतच आली आहे. पाचशे मीटर बंदीचा आदेश आला त्यावेळी जिल्ह्यातील २५४ पैकी केवळ ३० दुकाने शाबूत राहिली होती. परिणामी जिल्हाभरातील २२४ दुकानांना एकाचवेळी टाळे लागले होते. 
 
अचानक झालेल्या या बदलामुळे मद्य व्यवसायिक तर अडचणीत आलेच, मद्य शौकीनांचाही मोठ्या प्रमाणात हिरमोड झाला होता. त्यानंतर शासनाने नवे परिपत्रक जारी करुन २० हजारापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांना ५०० ऐवजी २०० मीटर बंदीचा आदेश बजावला. यामुळे आणखी काही दुकानांना अभय मिळून ते मद्य विक्रीस पात्र ठरले. 
 
दरम्यानच्या काळात बहुतेकांनी स्थलांतराचा पर्याय स्वीकारत नव्या जागांसाठी अर्ज सादर केले. हे अर्ज सादर करताना ग्रामपंचायत, नगरपालिका महापालिका यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नाहरकत दाखल्यांची अटही नंतर शासनाने शिथील केली. त्यामुळे अनेक मदिरालयांचा मार्ग मोकळा झाला. 
 
राज्य शासनाने मदिरालयांच्या बाबतीमध्ये एक निर्णय घेऊन महामार्गावरील दारू दुकाने बंद करून इतरत्र हलवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे शहरातील मार्गावरील बहूतांश दुकाने बंद झाली होती. त्यामुळे दारू शौकीनांची पंचाईत तसेच शासनाच्या करावरही त्याचा परिणाम झाला होता.मात्र आता दुकाने स्थलांतरीत झाल्यामुळे शासनाच्या करामध्ये वाढ होणार आहे. 
 
दारू दुकानाला विरोधाच्या ठिकाणी मतदान घेणार 
-कायदेशीर तरतुदींचा आधार घेऊन दुकानांचे स्थलांतर होत असले तरी नव्या जागांमध्ये काही ठिकाणी नागरिकांचा विरोधही होत आहे. हा विरोध मतदानाच्या प्रक्रियेद्वारे सिद्ध करावा लागतो. त्यासाठी त्या-त्या गाव/परिसरच्या नागरिकांकडून तशी तयारी करवून घेतली जात आहे.’’
राजेश कावळे, जिल्हा पोलिस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अकोला. 
 
दारू दुकानांचे आणखी १५ प्रस्ताव मान्यतेच्या प्रतीक्षेत 
नजिकच्या काळात आणखी १५ दुकानांना प्रशासनाची परवानगी मिळण्याची शक्यता असून तसे प्रस्ताव जिल्हाधिकारी आणि दारुबंदी विभागाचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या टेबलवर पोचले आहेत. या बदलामुळे संबंधित विभागाचा संचित तोटाही कमी होणार आहे. 
 
पुढील स्लाइडवर, तालुकानिहाय मद्यविक्रीची दुकाने...
बातम्या आणखी आहेत...