आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘डम्पिंग ग्राऊड हटवा’; आयुक्तांना घेराव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - प्रभाग क्रमांक 1 मधील डम्पिंग ग्राऊंडसह विविध समस्यांकडे पदाधिकारी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्थायी समिती समोर धरणे तसेच आयुक्तांना घेराव घालण्यात आला. या समस्यांचे निराकरण झाले नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा जन सत्याग्रह संघटनेने दिला आहे.

 
आसीफ अहमद खान यांच्या नेतृत्वात गेल्या काही महिन्यापासून डम्पिंग ग्राऊंड बाबत आंदोलन केले जात आहे. परंतु निवेदन द्यायला आल्या नंतर प्रशासन निवेदन घेण्याचेही कर्तव्य पार पाडीत नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.ही बाब लक्षात घेऊन संघटनेने प्रथम स्थायी समिती कार्यालया समोर धरणे दिले. यावेळी आयुक्त चेंेबर मध्ये होते. आयुक्त चेंबरच्या बाहेर आल्या नंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आयुक्तांना घेराव घातला. यावेळी अकोट फैल, शादाब नगर, लक्ष्मी कॉलनी,भारत नगर, बीके नगर,शिरोडा या भागातील समस्यांचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले. 

त्याच बरोबर स्थायी समिती सभापती बाळ टाले यांचा सोबत सुद्धा आंदोलनकर्त्यांनी चर्चा केली. निधी उपलब्ध झाल्या नंतर या भागातील समस्येचा निपटारा करण्यात येईल, असे आश्वासन सभापती बाळ टाले यांनी दिले. यावेळी सय्यद नासीर शेख अश्फाक, इमरान मिर्ज़ा,सय्यद ज़मीर ,शेख ज़ुबेर,सय्यद शकील,शेख सलमान,शेख इमरान,शेख मजहर,शेख अख्तर,हारुण शाह,मोहसीन खान,शेख वसीम,अज़ीन खान,चांद शाह,शब्बीर तेली,महंमद चाउस,महेबुब खान,अब्दुल राज़ीक,अनसार अहमद,साबीर तेली आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 
 
बातम्या आणखी आहेत...