आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ई-रिक्षाची महानगरात एन्ट्री; वायू, ध्वनी प्रदूषण कमी होण्यास मदत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरामध्ये पहिल्यांदाच प्रदूषणमुक्त इलेक्ट्रॉनिक्स म्हणजेच ई-रिक्षा सुरु झाली आहे. सध्यातरी एकुलती एक रिक्षा धावत असली तरी अशा रिक्षांची भर पडल्यास प्रदूषणाला आळा बसण्यात मदत होईल. 

वाहनांची वाढती संख्या आणि त्यामुळे दिवसेंदिवस वाढत असलेले प्रदुषण त्यावर उपाय म्हणून पुणे, मुंबई, नागपूर सारख्या मोठ्या शहरात ऑटोरिक्षाला पर्याय म्हणून रिक्षाकडे पाहिल्या जात आहे. नागपूर मध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर अकोल्यातील प्रमोद शंकरसा बिहाडे (रा. गजानन नगर , डाबकी रोड) यांनी पहिल्यांदा ई-रिक्षा विकत घेतला आहे. सध्या या रिक्षाकडे नागरिक कुतुहलाने पाहत आहेत. वायू ध्वनी प्रदुषणरहित रिक्षा म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे, राज्य परिवहन उपप्रादेशिक अधिकारी अतुल अादे यांनी नुकतीच रिक्षा संदर्भातएक बैठक घेतली शहरात रिक्षाला चालना देण्याबाबत चर्चा करण्यात आली. 
 
या रिक्षाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, रिक्षा एकवेळ पूर्ण चार्ज केल्यानंतर तास उपयोगात येऊ शकते. अशा रिक्षांमुळे शहरातील ध्वनी वायू प्रदुषण कमी होण्यास निश्चितच मदत होईल, असे मत रिक्षा चालक प्रमोद बिहाडेंनी सांगितले.या रिक्षामध्ये चार प्रवाशांना बसण्याची परवानगी परिवहन विभागाने दिली आहे. केंद्र सरकारने रिक्षाबाबत धोरण ठरवले आहे. तर गृह विभागाने वेगळे निकष निश्चित केले आहेत. राज्यातील पाच शहरामध्ये रिक्षा हे वाहन चालवण्यास सरकारने प्रायोगिक तत्वावर परवानगी दिली आहे. या रिक्षांना सुरुवातीच्या काळात विरोधही झाला होता. परंतु त्यावर सर्वंकष चर्चा होऊन प्रायोगिक तत्वावर परवानगी देण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...