आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दांडीबहाद्दरांचे प्रकरण मंत्रालयात; ‘शिक्षण विभागा’ने दिला अहवाल, शिक्षक हादरले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला- बाेरगाव मंजू येथील जिल्हा परिषद शाळेत उशिरा अालेल्या गैरहजर असलेल्या शिक्षकांचे प्रकरण थेट मंत्रालयात पाेहाेचले अाहे. याबाबत शिक्षण विभागाने केलेल्या कारवाईचा अहवाल सादर केल्याचे वृत्त अाहे. शिक्षण विभागाने यापूर्वीच २८ शिक्षक, मुख्याध्यापकांची एक दिवसाची रजा विनावेतन करण्याचा निर्णय घेतला हाेता. या वृत्ताला शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी दुजाेरा दिला अाहे. दांडीबहाद्दर शिक्षकांचे प्रकरण थेट मंत्रालयात पाेहाेचल्याने शिक्षकांच्या पायाखालची जमिनच सरकली अाहे. 
 
शिक्षकांचे वेतन, शालेय साहित्य, इमारत, शालेय पाेषण अाहारासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येताे. केवळ वाढीव वेतन, भत्त्यांसाठी वेळाेवेळी अांदाेलन करणाऱ्या काही शिक्षकांचा मनमानी कारभार शिक्षण सभापतींच्या पाहणीतून उजेडात अाला. सभापतींनी तेल्हारा अकाेट तालुक्यातील शाळांना अचानक भेटी देऊन पाहणी केली. त्यानंतर गत अाठवड्यात त्यांनी बाेरगावमंजू परिसरातील शाळांची पाहणी केली हाेती. 
 
या शिक्षकांची रजा केली विना वेतन 
बाेरगाव मंजू परिसरातील जिल्हा परिषद शाळांमधील २८ शिक्षका-शिक्षिकांची एका दिवसाची रजा विनावेतन करण्याचा निर्णय पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने घेतला. यामध्ये मराठीच्या शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या विनयकुमार खपली यांच्यासह सहाय्यक शिक्षक बाळू अाेंकार घाणे, उज्वला रामराव मानकर, प्रकाश हरिभाऊ बांेबटकर, शारदा गजानन माहाेरे, छाया अर्जुन नेमाडे, वर्षा सुनील मेतकर, जयश्री अनिल माेंढे, अनघा विजय पळसाेदकर, मनिषा रवींद्र बाेरे, दीपाली प्रवीण राेठे, वनिता देविदास झाकर्डे, अनिता रतनसा पवार, साधना अनंतराव देशपांडे, रजनी भाऊराव फाटे अाणि उर्दू शाळेचे मुख्याध्यापक सै. मतिन सै. समी यांच्यासह सहाय्यक शिक्षक माे. अादिल अब्दुल हमीद पटेल, अबु सलिम सिद्दीकी बशीर, शैहला परवीन महेबूब खान, जावेद अतहर खान महेबूब खान, शेख सुलतान शेख रहेमान, नूरुन्नीसा बेगम मुजफ्फर अली, खुर्शीद बी शेख इस्राईल, रिजवाना परवीन माे. उमर खान, सै. एजाज अली सै. अफसर अली, शबाना परवीन मुस्ताक पटेल, रुहुल अमिन माे. इसहाक, हाजरा परवीन नूर अहमद यांचा समावेश अाहे. 
 
पाेषण अाहार वितरणाची हाेणार आता चाैकशी 
शालेय पाेषण अाहार वितरणाचा मुद्दा यापूर्वी अनेकदा शिक्षण समितीच्या सभांमध्ये गाजला. सभापतींनी शालेय पाेषण अाहार वितरणबाबत माहिती सादर करण्याचा अादेशही अधिकाऱ्यांना दिला हाेता. मात्र, माहिती सादर केली नाही. त्यामुळे सभापतींनी शाळांना अचानक भेटी देऊन शालेय पाेषण अाहार वितरण प्रक्रियेचीही माहिती घेतली. या भेटीत विद्यार्थी अनेक दिवसांपासून शालेय पाेषण अाहारापासून (खिचडी) वंचित असून, अाहार वितरण प्रक्रियेत अनियमितता असल्याचे पाहणीतून समाेर अाले हाेते. शाळेततील प्रत्यक्ष उपस्थिती पाेषण अाहारासाठी उपस्थिती यामध्ये तफावत अाढळून अाली हाेती. या वितरण प्रक्रियेची सखाेल चाैकशी हाेणार अाहे.
 
सखाेल चाैकशी करणे अावश्यक 
जि. प. शिक्षक भरती, अांतरजिल्हा बदली, शिक्षक समायाेजनात अनेकदा घाेळ झाले. काही प्रकरणांत फाैजदारी कारवाई झाली. मात्र, घाेळ थांबत नसल्याचे दिसते. शिक्षणाधिकारी कार्यालयातील काही लिपिकांचे काही शिक्षक, दलालांशी लागेबांधे असल्याचे समजते. त्यामुळेच हे लिपिक अनेकदा अधिकारी, जि. प. पदाधिकाऱ्यांचा अादेश जुमानत नाहीत. मात्र, हेच लिपिक काही शिक्षक, दलालांची तळी उचलतात. त्यामुळे शिक्षणाधिकारी कार्यालयातील काही लिपिकांच्या काराभाराची चाैकशीची मागणी हाेत अाहे. 
 
शिक्षक, शिक्षिका, केंद्र प्रमुखांना खुलासा सादर करण्याचा अादेश 
बाेरगावमंजू परिरसरातील शाळांमधील गलथान कारभाराप्रकरणी केंद्र प्रमुखांना मंगळवारी कारणे दाखवा नाेटीस बजावली. शालेय पाेषण अाहाराची नाेंद सत्र सुरु झाल्यापासून केली नाही. बँकेतून १८ जानेवारी राेजी हजार ६४२ २४ मार्च राेजी १० हजार रुपये काढल्याचे पाहणीच्या वेळी दिसून अाले. मात्र, पैसे काढल्याच्या नाेंदीच राेकडवहीत घेतल्या नाहीत. याप्रकरणी शिक्षक, शिक्षिका, केंद्र प्रमुखांना खुलासा सादर करण्याचा अादेशही बजावला अाहे. 
बातम्या आणखी आहेत...