आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात 345 कोटींची वीज कामे प्रगती पथावर, खा. प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नांना आले यश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - जिल्हाविद्युत समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यात महावितरणाच्या ३४५ कोटींची कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये कृषीपंप, औद्योगिक, वाणिज्यीक, पाणीपुरवठा या संबधीच्या योजनांसह वीज वितरण जाळ्याचे बळकटीकरण अद्यावतीकरणासह शेतकऱ्यांसंबंधी महत्वाच्या योजनांचा समावेश आहे.
जिल्ह्यात प्रगती पथावर असलेल्या कामांमध्ये इन्फ्रा, एकात्मिक ऊर्जा विकास, ग्राम ज्योती, सौरकृषी पंप योजनेअंतर्गत कामे सुरु आहेत. ग्रामीण भागातील फिडर सेपरेशन, ग्रामीण उपकेंद्र, रोहित्र अद्यावतीकरण विद्युत प्रणालीमधील दोष दूर करुन वाहिन्या सुस्थितीत ठेवणे. नव्या उपक्रमांची निर्मिती यासंबधीच्या कामाचा अधिकाऱ्यांकडून खासदार जाधव आढावा घेत आहेत. १०२.३० कोटी रुपयांच्या इन्फ्रा योजना-२मध्ये ३३/११ केव्हीचे १२ नवीन उपकेंद्र यामध्ये इसरुळ, शेंदुर्जन, कळंबेश्वर, नारायणखेड, जांभुळधाबा,भालेगांव (खामगांव), पिंपळगांव उंडा, भालेगांव (मेहकर), महारखेड, उमापूर, वाघजळ पळशी बु. यांचा समावेश अाहे. यातील १० उपकेंद्रांची कामे पुर्ण झाली आहे. तर महारखेड उमापूर ही कामे प्रगती पथावर आहे. तसेच ३३/११ केव्हीच्या उपकेंद्रामध्ये धामणगाव, मंगरुळ नवघरे, चांडोळ, मुरादपूर, किनगावराजा, सिंनगाव जहॉंगीर, माटरगाव येथे अतिरिक्त पॉवर ट्रॉन्सफॉर्मर टाकण्याची कामे या योजनेत पूर्ण झाली आहेत. शिवाय ५४८ पैकी ५०५ नवीन रोहित्राची कामे पूर्णत्वास आली आहेत.

उर्वरित कामे प्रगती पथावर असून त्याचा पाठपुरावा सुरु आहे. ४७० रोहित्रांची क्षमता वाढविण्याचे कामही यात समाविष्ट आहे. एकात्मिक ऊर्जा विकास योजनेच्या १७.३५ कोटीचा पहिला टप्पा प्रगतीपथावर आहे. याच योजनेचा १७.३५ कोटीचा दुसरा टप्पा प्रस्तावित आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेचा पहिला टप्पा ४२.७० कोटींचा असून, सोयगांव, पेठ, उंद्री, देऊळगाव साकर्शा, लाखनवाडा, हरसोडा, नारखेड, करमोडा येथील उपकेंद्र अाहेत.१२,६९३ दारीद्र्यरेषेखालील लोकांना वीजपुरवठा करणे. १७० रोहित्र निर्मिती यासह अन्य कामांचा समावेश आहे. ही योजना मंजूर झाली असून निविदा प्रक्रिया सुरु आहे. पंडीत दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेच्या ६१.९७ कोटीच्या दुसऱ्या टप्प्यात तराडखेड, म्हसला, नायगांव बु., मेरा बु., काटेल, मोळा, पिंपळगांव देवी, शेलापूर, सुनगांव येथील या गावांमधील ३३/११ केव्ही उपकेंद्र, ४६८ रोहित्र तेराही तालुक्यांतील कामांचा समावेश आहे.

ही योजना जिल्हा विद्युत समितीने प्रस्तावित केली आहे. तर ९७.८० कोटीच्या सौरकृषीपंप योजनेत आतापर्यंत १४७ सौरपंप कार्यान्वीत करण्यात आलेले आहेत. १६६० कृषीपंपाच लक्षांक यात ठेवण्यात आले असुन ५९३ शेतकऱ्यांनी मागणीपत्र दिले आहे.
बातम्या आणखी आहेत...