आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

११८ जणांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - जिल्ह्यातील नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी मतदानाची प्रक्रिया किरकाेळ अपवाद वगळता रविवारी शांततेत पडली. जिल्हयात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ५१. २२ टक्के मतदान झाले. एकूण ११८ लाेकप्रतिनिधींचे राजकीय भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद झाले अाहे. साेमवारी सकाळपासून मतमाेजणीला प्रारंभ हाेणार अाहे. संध्याकाळपर्यंत सर्वच ठिकाणचे निकाल घाेषित हाेण्याची शक्यता अाहे.
जिल्ह्यातील पाच नगराध्यक्षांसह नगरपरिषदांच्या ११८ लोकप्रतिनिधींसाठी २७ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळात ईव्हीएममध्ये हे मतदान नाेंदवण्यात अाले. जिल्हयात सकाळी थंडीमुळे नंतर नागरिक माेठ्या प्रमाणात मतदानासाठी घराबाहेर पडले. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या हाेत्या. अनेक ठिकाणी मतदारांना नाव शाेधून देण्यासाठी सामाजिक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मदत केली.
मूर्तिजापूर येथे एका प्रभागात दाेन उमेदवारांमध्ये वाद झाला. मात्र नंतर हा वाद मिटला.

जिल्हयात पाच नगराध्यक्षांसाठी ३९ उमेदवार मैदानात हाेत. मूर्तिजापूर, पातूर आणि तेल्हारा या तीन ठिकाणचे पद महिलांसाठी राखीव अाहेत. ११३ नगरसेवकांसाठी ५१७ उमेदवार मैदानात हाेते. सर्वाधिक ३३ नगरसेवक निवडून द्यावयाच्या अकोट नगरपरिषदेची संख्या १५४ वर स्थिरावली हाेती. बाळापूर आणि मूर्तिजापूर नगरपरिषदेची श्रेणी अकोट प्रमाणेच ‘ब’ आहे. या ठिकाणी प्रत्येकी २३ नगरसेवकांची निवड करावयाची असून, त्यासाठी अनुक्रमे ८९ आणि १३१ उमेदवार रिंगणात हाेते. पातूर तेल्हारा या ‘क’ वर्ग नगरपालिकेसाठी प्रत्येकी १७ नगरसेवकांसाठी नागरिकांनी मतदान केले.

नगराध्यक्षासाठी सर्वाधिक १० उमेदवारांसाठी अाकाेटात मतदान झाले. त्याखालोखाल प्रत्येकी उमेदवार बाळापूर पातूरमध्ये रिंगणात हाेते. तेल्हाऱ्यातील सात महिलांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली. मूर्तीजापूर येथे ही संख्या सर्वात कमी सहा हाेती. अकोट, बाळापूर वगळता इतर तीन नगरपरिषदांचे नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे. त्यातही पातूर नगरपरिषदेत अनुसूचित जातीच्या महिलेलाच उभे राहण्याची मुभा देण्यात आली आहे.

जिल्हयात दुपारी ३.३० वाजतापर्यंत एकूण लाख ८१ हजार ५२६ पैकी ९२ हजार ९८१ मतदारांनी मतदान केले. पुरुष ९५ हजार ३७ मतदारांपैकी ४८ हजार २२२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ८६ हजार ४८९ महिला मतदारांपैकी ४४ हजार ७५९ मतदारांनी मतदान केले.

बाळापूरमध्ये दुपारपर्यंत सर्वाधिक मतदान
दुपारी३.३० वाजतापर्यंत बाळापूरमध्ये सर्वाधिक ५८.२६ टक्के मतदान झाले. अाकाेट-४८.४१, मूर्तिजापूर:-४८.५०, पातूर:-५१.४६ अाणि तेल्हारा येथे ५४.४४ टक्के मतदान झाले.

असाहाेता पोलिस बंदाेबस्त
जिल्ह्यातील नगर पालिका नगराध्यक्षपदासाठी मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी जिल्ह्यात तगडा पोलिस बंदाेबस्त तैनात करण्यात अाला हाेता. एकूण ७०० अधिकारी-कर्मचारी तैनात हाेते. या व्यतिरिक्त एसअारपीएफ आणि अारसीबीचे जवानही बंदाेबस्तामध्ये सहभागी झाले हाेते.


पालिकानिहाय बूथची संख्या:
जिल्हयात नगराध्यक्ष, नगरसेवक निवडणूक प्रक्रियेत नगराध्यक्ष इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचे ६०९ बॅलेट युनीट (बीयु) आणि २९३ कंट्रोल युनीट (सीयु) वापरण्यात अाले. जिल्ह्यात एकूण २४५ बुथवर मतदानाची व्यवस्था हाेती. हे बूथ १८ महसूल मंडळांमध्ये विभाजित करण्यात अाले. शनिवारी सध्याकाळीच अधिकारी-कर्मचारी नेमून दिलेल्या ठिकाणी पाेहाेचले हाेते. रविवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिस दलाच्या लेखी संवेदनशील असलेल्या पालिका क्षेत्राची पाहणी केली.

अशा हाेत्या मशिन्स अशी होती बूथची व्यवस्था
जिल्हयातीलपाच नगरपािलकेच्या एकूण ११३ जागांसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. जिल्हयात एकूण २४५ बुधवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. व्यवस्थेच्या दृष्टीने हे बुथ १८ महसूल मंडळांमध्ये विभाजित करण्यात अाले होते.
बातम्या आणखी आहेत...